Gauri Khan Net Worth : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा एक उत्तम रोमँटिक हिरो तर आहेच पण त्याची गणना जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्येही केली जाते. शाहरुख खानने बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोमान्सपासून ते ॲक्शनपर्यंत अनेक कलाकारांना तो मात देत असतो. टीव्हीच्या दुनियेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारा किंग खान आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला जवान आणि त्या आधीचा पठाण, या शाहरूखच्या दोन्ही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली होती.
शाहरुखची पत्नीही श्रीमंत
शून्यातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शाहरुख खानने प्रचंड मेहनत करत आज हे स्थान गाठले आहे. पण फक्त शाहरूखच नव्हे तर त्याची लेडी लव्ह, अर्थात त्याची पत्नी गौरी खान ही देखील तिच्या पतीइतकीच श्रीमंत आहे. शाहरूखची पत्नी एवढीच गौरीची ओळख नाही तर ती एक नामांकित डिझायनर आहे. ती व्यावसायिकरित्या अतिशय यशस्वी आहे.
गौरीचं रेस्टॉरंट
सध्या गौरी खानचा सोशल मीडियावर बराच बोलबाला आहे. गौरी खानने नुकतेच मुंबईत ‘तोरी’ नावाचे एक आलिशान रेस्टॉरंट उघडल्याचे वृत्त आहेडले आहे. त्याच्या ओपनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कामासोबत गौरी खानने रेस्टॉरंट व्यवसायातही दमदार एन्ट्री केली आहे. व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेली गौरी खान आता स्वतःचे रेस्टॉरंटही चालवत आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खाननेही आपल्या मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा केला आहे आणि आज ती एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. गौरी खानही तिचा पती शाहरुख खानप्रमाणेच वर्षाला कोट्यवधी रुपये कमावते. गौरी खान ही केवळ शाहरुख खानची पत्नी नाही तर तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ती एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे.
गौरी खानचे नेटवर्थ
शाहरुख खानप्रमाणेच त्याची पत्नी गौरी खान देखील करोडोंच्या संपत्तीची मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एकूण 1725 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे. तर शाहरुख खान याच्याकडे एकूण 760 दशलक्ष डॉलर्स असून या अफाट संपत्तीचा तो मालक आहे. गौरी खान दरवर्षी सुमारे 100 कोटींच्या आसपास कमाई करते.
अनेक सेलिब्रिटींचं घर सजवलं
प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर असलेल्या गौरीने अनेक बॉलिवूड स्टार्स तसेच बिझनेसमन आणि व्हीआयपींचं घर सुंदर सजवलं आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ, अनन्या पांडे आणि करण जोहर यांसारख्या अनेक कलाकरांच्या घराचं इंटिरिअर गौरीने डिझाईन केलं आहे. एवढेच नव्हे तर तिने मुकेश अंबानी, रॉबर्टो कॅव्हली आणि राल्फ लॉरेन यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींची घरंही डिझाइन केली आहेत.
फिल्म प्रोड्यूसरही आहे गौरी
एक यशस्वी उद्योजक असलेली गौरी ही एक यशस्वी प्रोड्युसर देखील आहे. तिने 2002 मध्ये चित्रपटांची निर्मिती करायला सुरुवात केली. पती शाहरुख खानसोबत ‘रेड चिलीज’ हे प्रॉडक्शन हाऊस 2002 साली तिने सुरू केले. या प्रॉडक्शन हाऊसने आत्तापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे.