उस्मानाबाद : सध्या सोशल मीडियावर डान्सर गौतमी पाटीलचे ( Gautami Patil ) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच आता गौतमीचा एक व्हिडीओ तुफान धुमाकूळ घालत आहे. गौतमीचे असे अनेक कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण सध्या गौतमीच्या उस्मानाबादमधील (Osmanabad Gautami Patil Dance Video Viral) कार्यक्रमाची जास्त चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या दिलखेच अदा आणि डान्स पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. काही चाहते तर तिचा डान्स पाहण्यासाठी चक्क झाडावर चढले होते.
पहा व्हिडीओ :
उस्मानाबादमधील गौतमीचा व्हिडीओ व्हायरल
उस्मानाबादमध्ये 4 डिसेंबरला गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तुळजापूर तालुक्यातील वडगावमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त तिचा कार्यक्रम अयोजित केला होता. त्यामध्ये गौतमी पाटील हीने लावणी सादर केली. तिच्या लावणी आणि डान्स पाहण्यासाठी आसपासच्या तरुण चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तिचा हा डान्स पाहण्यासाठी काही चाहते चक्क झाडावर चढले.
कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून आयोजकांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. चक्क कार्यक्रम झाल्यावरती गौतमीला पोलिसांच्या गाडीमध्ये बसून जावं लागलं.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना का होतेय गर्दी?
सध्या सोशल मीडियावर गौतमीचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गौतमीच्या काही अश्लील डान्सच्या क्लिप देखील व्हायरल होत आहेत. ज्यामुळे काही कलाकार देखील तिच्या डान्सवर नाराज झाले आहेत. तिच्या डान्समधील स्टेप्सवर देखील काही चाहत्यांनी नाराजी दाखवली आहे. टीकेनंतर गौतमी पाटीलने माफी देखील मागितली आहे.