Devoleena Bhattacharjee : गोपी बहूने दिली गुड न्यूज, देवोलीनाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

| Updated on: Dec 19, 2024 | 12:23 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेग्नन्सीमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही चर्चेत होती. पती शहनवाज सह देवोलीना हिने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये तिचं बेबी बम्प दिसत होतं. तिने ही गुड न्यूज काही महिन्यांपूर्वीच शेअर केल्यानंतर तिला मुलगा होणार की मुलगी याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. देवोलिना हिच्या घरी गुड न्यूज आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं.

Devoleena Bhattacharjee : गोपी बहूने दिली गुड न्यूज, देवोलीनाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन
देवोलीनाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन
Image Credit source: instagram
Follow us on

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेग्नन्सीमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही चर्चेत होती. पती शहनवाज सह देवोलीना हिने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये तिचं बेबी बम्प दिसत होतं. तिने ही गुड न्यूज काही महिन्यांपूर्वीच शेअर केल्यानंतर तिला मुलगा होणार की मुलगी याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. देवोलिना हिच्या घरी गुड न्यूज आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. लाडक्या गोपी बहूने मुलाला जन्म दिला आहे.

देवोलीना आणि शाहनवाज यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये नवविवाहित जोडप्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. या गुड न्यूजमुळे या जोडप्याचे चाहतेही खूप खूश आहेत आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी त्यांच्या नवजात बाळालाही खूप आशीर्वाद दिले आहेत.

सोशल मीडियावर अशी दिली गुड न्यूज

देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आहे. “आम्ही आमचा हा छोटासा आनंद व्यक्त करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आमचा मुलगा या जगात आला आहे. 18.12.2024 ” अशी तारीखही अभिनेत्रीने त्या पोस्टमध्ये नमूद केली आहे. देवोलीना आणि शहनाज यांनी काल मुलाचे स्वागत केले, परंतु एका दिवसानंतर, अर्थात आज त्यांनी ही गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली. देवोलिना आई झाल्याची बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांसह सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत.

 

2022मध्ये लग्न

गोपी बहूच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली देबोलिना ही बिग बॉसमध्येही झळकली होती. गेल्या काही वर्षांपासून ती टीव्हीवर फारशी दिली नसली तरी तिचे आजही खूप चाहते आहेत. 2022 साली देबोलिना हिने तिचा बॉयऱफ्रेंड आणि जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं. देवोलिना हिंदू तर शाहनवाज हा मुस्लिम असून दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. या लग्नानंतर देवोलिनाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्यावर खूप टीकाही झाली.