लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट, काय आहे नेमकं कारण?

| Updated on: Feb 25, 2025 | 11:38 AM

अभिनेता गोविंदाचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. आता गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याचे समोर आले आहे.

लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट, काय आहे नेमकं कारण?
Govinda and Sunita
Image Credit source: Instagram
Follow us on

Govinda and Sunita Ahuja Divorce: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गोविंदा आणि सुनीता घटस्फोट का घेत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागचे कारण देखील समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे. रेडिटवरील एका पोस्टनुसार गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या अनेक मुलाखतींमध्ये सुनीताने गोविंदाच्या अफेअरबाबत संकेत दिले होते. त्यांचे वेळापत्रक जुळत नसल्याने ते दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात असल्याचे तिने सांगितले होते.

गोविंदा आणि सुनीता यांच्याकडून घटस्फोटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच गोविंदाचे कोणत्या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर आहे याविषयी देखील माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चा किती खऱ्या आहेत हे ते दोघेचे सांगू शकतात.

हे सुद्धा वाचा

सुनीता गोविंदासोबत राहत नाही?
सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती गोविंदासोबत राहत नाही. सुनीताने सांगितले होते की ते बऱ्याच वेळा वेगळे राहतात. सुनीता एका फ्लॅटमध्ये मुलांसह राहते. तर गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. याशिवाय सुनीता म्हणाली होती की, ‘कोणत्याही माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. तो कुठे जाईल? पूर्वी मी कुठेही जात नसे आणि आता मला माहित नाही…’ सुनीता म्हणाली पुढे म्हणाली होती की मी पूर्वी खूप सुरक्षित होते. पण मी आता नाही. वयाची साठी ओलांडल्यानंतर लोक विचित्र वागायला लागतात. गोविंदाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तो काय करतोय कुणास ठाऊक. मी गोविंदाला सांगितले की तू ६० वर्षांचा झाला आहेस, हट्टी होऊ नकोस. पण तो काही ऐकत नाही.’

गोविंदा आणि सुनीताने १९८७ साली लग्न केले होते. दोघांनीही अगदी कमी वयात लग्न केले होते. त्यावेळी सुनीला केवळ १८ वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदाला दोन मुले आहे. मुलीचे नाव टीना आहे तर मुलाचे नाव यशवर्धन आहे.