‘हमारे बारह’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात? राष्ट्रवादीचा चित्रपटावर आक्षेप

| Updated on: Jun 01, 2024 | 6:00 PM

अभिनेता अन्नू कपूरचा 'हम दो हमारे बारह' हा चित्रपट वादात भोवऱ्यात सापडला आहे. वादाचे कारण आहे चित्रपटाचे पोस्टर. पोस्टरमध्ये अन्नू कपूर त्याच्या 11 मुलांसोबत दिसत आहे.

हमारे बारह चित्रपट वादाच्या भोवऱ्यात? राष्ट्रवादीचा चित्रपटावर आक्षेप
Follow us on

Hamare Barah movie : अभिनेता अन्नू कपूरचा ‘हम दो हमारे बारह’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले कुटुंब मुस्लिम असल्याचे दिसते. या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. काही चित्रपट प्रेमींकडून देखील या चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून देशातील मुस्लिम समाजाची वाढती लोकसंख्या दाखवण्यात आली असून याच समुदायाला लोकसंख्येचा स्फोट होण्याचे कारण मांडण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून इस्लामला नापसंतीची भावना व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचा आक्षेप काय?

मनोरंजन क्षेत्रात चित्रपट हे प्रबोधनाचं साधन जरी असले तरी लोक प्रसिद्धीसाठी नवनवीन युकत्या शोधून काढताना दिसत आहेत. अशातच 7 जून 2024 ला प्रदर्शित होणाऱ्या ‘हमारे बाराह‘ चित्रपटाबद्दल राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, हमारे बाराह या चित्रपटाला आम्ही विरोध पण केली नाही आणि या चित्रपटाला आम्ही समर्थनही दिलं नाही. मात्र गृह खात्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या सिनेमाचे,निर्माते -दिग्दर्शक आणि काही प्रमुख कलाकार या सर्वांसोबत बसून हा सिनेमा पहावा. सिनेमात काही वादग्रस्त गोष्टी असतील तर त्या काढाव्यात जेणेकरून प्रदर्शित झाल्यानंतर होणारे वाद किंवा आंदोलने तोडफोड हे टाळता येऊ शकते.

‘हमारे बाराह’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय? पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची गृहमंत्र्यांना विनंती