Happy Birthday R Madhavan | आर माधवनची विद्यार्थिनी होती सरिता बिर्जे, ‘अशी’ जुळली दोघांची हृदय! वाचा गोड प्रेमकथा…

| Updated on: Jun 01, 2021 | 10:27 AM

बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) आज (1 जून) आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. माधवनचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर येथे झाला होता. तो सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप तल्लख होता. त्याला अभ्यासाक्रम पूर्ण केल्यानंतर सैन्यात भारती व्हायचे होते.

Happy Birthday R Madhavan | आर माधवनची विद्यार्थिनी होती सरिता बिर्जे, ‘अशी’ जुळली दोघांची हृदय! वाचा गोड प्रेमकथा...
आर माधवन
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) आज (1 जून) आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. माधवनचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर येथे झाला होता. तो सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप तल्लख होता. त्याला अभ्यासाक्रम पूर्ण केल्यानंतर सैन्यात भारती व्हायचे होते. पण कदाचित त्याच्या नशिबात अभिनय लिहिला असावा की तो पुढे मनोरंजन विश्वाकडे वळला. पण त्याहूनही सुंदर आहे ती त्याची प्रेमकथा!(Happy Birthday R Madhavan know about actors cute love story)

खूप कमी लोकांना माहित आहे की, अभिनेत्याने त्याच्याच विद्यार्थिनीशी लग्न केले होते. होय, आर. माधवनची पत्नी सरिता बिर्जे तो शिकवत असलेल्या वर्गात शिकत होती. चला तर मग जाणून घेऊया या जोडीची क्युट लव्हस्टोरी…

आधी मैत्री, मग प्रेम…

महाविद्यालयीन अभ्यासादरम्यान आर माधवन याने कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग क्लासेस सुरू केले होते. या दरम्यान सरिताने त्याच्या या क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि आर. माधवन सरिताला शिकवू लागला. या क्लासेस दरम्यान सरिताला एअरहोस्टेसची नोकरी मिळाली. त्यानंतर सरिता आभार मानण्यासाठी आर माधवनला डिनरसाठी घेऊन गेली. येथूनच या दोघांची मैत्री सुरू झाली आणि काही दिवसातच दोघांच्या मैत्रीमध्ये प्रेम फुलू लागले. या जोडीने बरीच वर्ष एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले. आर माधवन आणि सरिता यांना वेदांत नावाचा एक मुलगा देखील आहे (Happy Birthday R Madhavan know about actors cute love story).

एखाद्या मुलीने मला विचारणं म्हणजे…

आर माधवन याने एकदा आपली प्रेमकथा सांगताना म्हटले होते की “सरिता माझी विद्यार्थीनी होती. तिने एकदा डिनरला जाण्यासाठी माझ्याकडे विचारणा केली. मी एक सावळा मुलगा होतो. त्यावेळी मला एखाद्या मुलीने असं काही विचारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी पण तिला हो म्हटले. ज्यानंतर आमची मैत्री सुरू झाली आणि नंतर प्रेम, मग आमचं लग्न झालं.” लग्नानंतरच आर माधवनने चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्याने बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले, त्यानंतर त्यांना चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.

माधवनची कारकीर्द

सुरुवातीच्या काळात, अभिनेता चंदन पावडरच्या जाहिरातीमध्ये काम करत होता. तर त्याचवेळी तो दुसरीकडे टीव्ही मालिकांमध्येही सातत्याने काम करत होता. आर माधवनने ‘बनेगी अपनी बात’ आणि ‘तोल मोल के बोल’सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्याने तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘इस रात की सुबह नही’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख मिळाली ती सुपरहिट फिल्म ठरलेल्या ‘रेहाना है तेरे दिल मे’ या फिल्ममधून मिळाली. या चित्रपटानंतर अभिनेत्या कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याने बरेच सुपरहिट चित्रपट केले आणि आजही तो आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

(Happy Birthday R Madhavan know about actors cute love story)

हेही वाचा :

Inside Story | शाहरुख खानच्या वडिलांनी खरंच नाकारला होता ‘मुगल-ए-आजम’? जाणून घ्या ‘या’ मागचं सत्य…

Love Story | बिपाशाशी ब्रेकअपनंतर जिममधल्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला जॉन अब्राहम, वाचा प्रिया-जॉनची प्रेमकथा