Hema Malini And Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) लाखो फॅन आहेत. त्याचे स्टारडम असे आहे की तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ किंग खान हा चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘पठाण’ या शाहरुख खानच्या चित्रपटाने तो अजूनही बॉक्स ऑफिसचा बादशहा असल्याचे सिद्ध केले. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही एका मुलाखतीत शाहरुख खानच्या स्टारडम बद्दल आणि त्याच्या सुपरस्टार पदाबाबत एक किस्सा सांगितला आहे.
हेमा मालिनी यांच्या गुरू माँ यांनी शाहरुख खान बद्दल एक भाकित केले होते, जे खरं झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी एक आठवण सांगितली. ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी हेमा मालिनी यांनी शाहरुख खानला नवोदित कलाकार म्हणून साइन केले होते, त्या काळाबद्दल त्या बोलत होत्या. एक दिवस हा मुलगा मोठा सुपरस्टार बनेल, असे भाकित गुरूंनी केल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले .
1992 साली शाहरूखला हा चित्रपट ऑफर झाला होता. तोपर्यंत त्याचे चार चित्रपट रिलीज झाले होते. बॉलिवूडमध्ये हे त्याचं पहिलंच वर्ष होतं. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांचा ‘दिल आशना है’ हा शाहरुख खानचा पहिला प्रोजेक्ट होता ज्यासाठी त्याने शूट केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हेमा मालिनी यांनीच केली होती.
शाहरूख बद्दल बोलताना हेमामालिनी यांनी एक आठवण सांगितली. ‘मी जेव्हा दिल आशना है चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत होते, तेव्हा टीव्हीवर शाहरूखची फौजी मालिका लागत होती. त्यामध्ये मला शाहरूखचं काम खूप आवडलं होतं. मी नेहमी ती मालिका बघायचे आणि तेव्हाच मला वाटलं की या चित्रपटासाठी नवा चेहरा म्हणून शाहरूखची निवड करावी. त्याच्याहून अधिक चांगला मुलगा या भूमिकेसाठी मिळणार नाही. अशा पद्धतीने मी त्याला चित्रपटासाठी साईन केलं ‘ असे हेमा मालिनी यांनी सांगितले.
हेमा मालिनी यांच्या बहिणीने हेमा आणि धर्मेंद्र यांची शाहरुखशी भेट घालून दिली. त्यानंतर हेमा मालिनी यांच्या गुरूंनी सांगितलं की, तुम्ही एका मोठ्या सुपरस्टारशी जोडल्या जाणार आहात. मात्र तेव्हा हेमा मालिनी यांना काही समजू शकले नाही, पण त्यांच्या गुरु म्हणाल्या की तो (शाहरुख) मोठा सुपरस्टार होईल.