सर्वाधिक कर भरणारे बॉलिवूड सेलिब्रिटी कोणते? Fortune India कडून यादी प्रसिद्ध

| Updated on: Nov 30, 2024 | 4:33 PM

Highest Tax Paying Bollywood Celebs: भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार अशा अनेक बड्या नावांचा समावेश आहे. Fortune India ने जाहीर केलेली यादी पाहा

सर्वाधिक कर भरणारे बॉलिवूड सेलिब्रिटी कोणते? Fortune India कडून यादी प्रसिद्ध
Follow us on

Highest Tax Paying Bollywood Celebrity : Fortune India ने भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य तर करतातच, पण वेळेवर कर भरण्यातही ते पुढे असतात. नुकतीच Fortune India ने भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी जाहीर केली असून त्यात शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार अशा अनेक बड्या नावांचा समावेश आहे.

Fortune India च्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान आहे, ज्याने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्याखालोखाल थलापति विजय यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी सुमारे 80 कोटी रुपयांचा कर भरला आहे. Fortune India च्या या यादीत सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने जवळपास 75 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण, रणबीर कपूर आणि हृतिक रोशन यांसारख्या बड्या नावांचाही या यादीत समावेश आहे.

‘हे’ आहेत सर्वाधिक कर भरणारे सिनेस्टार्स

  • शाहरूख खान – 92 कोटी
  • थलापति विजय – 80 कोटी
  • सलमान खान – 75 कोटी
  • अमिताभ बच्चन – 71 कोटी
  • अजय देवगण -42 कोटी
  • रणबीर कपूर – 36 कोटी
  • हृतिक रोशन – 28 कोटी
  • कपिल शर्मा – 26 कोटी
  • करीना कपूर – 20 कोटी
  • शाहिद कपूर – 14 कोटी
  • मोहनलाल – 14 कोटी
  • अल्लू अर्जुन – 14 कोटी
  • कियारा अडवाणी – 12 कोटी
  • कतरिना कैफ – 11 कोटी
  • पंकज त्रिपाठी – 11 कोटी

यादीत 3 अभिनेत्रींचा समावेश

सर्वाधिक कर भरणाऱ्या टॉप 15 फिल्मी व्यक्तींच्या या यादीत 3 अभिनेत्रींचा समावेश आहे. यामध्ये करीना कपूर, कियारा अडवाणी आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. Fortune India ने दिलेल्या माहितीनुसार, करिना कपूर गेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी कर भरून यादीत नवव्या क्रमांकावर आहे. या यादीत 13 व्या स्थानावर असलेली कियारा अडवाणी आर्थिक वर्ष 2024 साठी 12 कोटी आणि कतरिना कैफ 11 कोटी कर भरून 14 व्या स्थानावर आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि चित्रपट अभिनेता कपिल शर्मा या यादीत आठव्या स्थानावर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांनी 26 कोटी कर भरला आहे.