अभिनेत्री हिना खानचं वैयक्तिक आयुष्य सध्या बरंच चर्चेत आहे. टीव्ही मालिक गाजवणाऱ्या हिनाने मोठ्या पडद्यावरही काम केलं असून सध्या ती आयुष्याच्या खडतर टप्प्यातून जात आहे. एकीकडे तिचा ब्रेस्ट कॅन्सरशी लढत असतानाच दुसरीकडे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील अनेक जण हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती एकेक असा पोस्ट शेअर करत्ये, ज्यावरून अनेकांना असा अंदाज वर्तवला आहे की हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल या दोघांचं ब्रेकअप झालंय. आता याच बातम्यावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कांची सिंह हिनेही प्रतिक्रिया दिली आहे.
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून हिना खान तिच्या इन्स्टा स्टोरीवर हृदयभंगाच्या आणि भावनिक पोस्ट शेअर करत आहे. त्या पोस्ट्स पाहिल्यानंतर हिना आणि रॉकीच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला. या कठीण काळात लढण्यासाठी सर्वजण धीर हिनाला देताना दिसले. पण ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, टीव्ही अभिनेत्री कांची सिंगचे काही वेगळेच म्हणणे आहे. अभिनेत्रीने हिना आणि रॉकी यांच्या नात्यामागील सत्य तिने सर्वांसोबत शेअर केले आहे. एका मुलाखतीदरम्यान कांची म्हणाली, “हिना आणि रॉकीच्या ब्रेकअपच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. हे होऊच शकत नाही.”
काय म्हणाली कांची सिंह ?
एका इंटरव्ह्यूदरम्यान कांची म्हणाली की, ‘भलेही जग इकडचं तिकडे झालं तरीही रॉकी भैय्या हिनाची सोबत कधीच सोडणार नाहीत. ‘ कांचीच्या या विधानानंतर हिना खानच्या चाहत्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला असेल. गेल्या अनेक दिवसांपासून हिना आणि रॉकीच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहेत. पण अद्याप त्या दोघांपैकी कोणीही या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघेही त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर मौन राखून आहेत. तर दुसरीकडे हिना सतत तिच्या पोस्ट्सद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, जर या कपलमध्ये सर्व काही ठीक असेल तर हिनाच्या अडचणीचे कारण काय ? ती अशा पोस्ट्स का टाकत आहे ?
अलीकडेच हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते की, “मी आयुष्यात काही शिकले असेल तर ते म्हणजे जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्हाला कधीच सोडत नाहीत. सोडणारे लोक कोणाचा तरी वापर करत असतात” अशी तिची पोस्ट होती. एवढंच नव्हे तर तिने संयम राखण्यासाठी देखील एक पोस्ट लिहीली होती. त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, तिच्या ब्रेकअपबद्द लोक विविध अंदाज वर्तवत असतात.