हॉलिवूड गायिका काइली मिनोग आज तिचा 53 वा वाढदिवस साजरा करतेय. काइलीचा जन्म 28 मे 1968 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता. ती एक गायिका आणि अभिनेत्री आहे.
काइलीनं तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक अल्बम रिलीज केले आहेत. 2020 मध्ये तिचा डिस्को अल्बम आला होता. याशिवाय नुकतंच प्रसिद्ध झालेलं हे गाणे रियल ग्रूव्ह स्पॉटिफाईवर 10 दशलक्ष वेळा स्ट्रिम झालं आहे.
काइली ही फक्त हॉलिवूडचं मोठे नाव नाही तर तिनं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. काइलीनं अक्षय कुमार आणि संजय दत्त स्टारर फिल्म ब्लूमध्ये कॅमिओ केला, तसेच एक गाणंही गायलंय.
2009 मध्ये आलेल्या ‘ब्लू’ या चित्रपटाच्या प्रसिद्ध गाण्या चिगी विगीमध्ये अक्षय कुमारसोबत काइली डान्स करताना दिसली होती. या गाण्यात परफॉर्म करण्याबरोबरच काइलीनं हे गाणं सोनू निगमसोबत गायलं होतं.
53 वर्षांची असूनही, काइली सुपरफिट आहे आणि तिच्या गायनाचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड सुंदर आहेत.
वयाच्या 36 व्या वर्षी काइलीला कर्करोगानं ग्रासलेलं होतं. त्यावेळी मीडियानं काइलीच्या उपचारांवर उघडपणे कव्हरेज केलं होतं.