कुणी फेकल्या अस्थी,कोणी लघवीच्या बाटल्या, तर कोणी फेकलं जिवंत वटवाघूळ; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना आलेले भयानक प्रसंग

| Updated on: Jan 08, 2025 | 7:30 PM

जिवंत वटवाघळापासून ते अगदी लघवीच्या बाटल्यांपर्यंत अनेक विचित्र गोष्टी लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांच्या अंगावर फेकण्यात आल्या होत्या.अरिजित सिंग ते आयुष्मान खुरानापर्यंत अनेक गायकांनी असे भयानक प्रसंग अनुभवल्याचे किस्से घडले आहेत.

कुणी फेकल्या अस्थी,कोणी लघवीच्या बाटल्या, तर कोणी फेकलं जिवंत वटवाघूळ; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना आलेले भयानक प्रसंग
Follow us on

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक प्रसिद्ध गायक आहे. ज्यांचे ठिकठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट होतच असतात. एवढच नाही तर असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत जे अभिनयासोबतच गातातही. त्यांनाही लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान विचित्र अनुभव आले आहेत.

पण, तुम्हाला माहिती आहे का की, परदेशात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अशा घटना घडणं खूप सामान्य झाल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक काही वेळा कलाकारावर अनेक विचित्र वस्तू फेकतात. अशाच काही विचित्र घटनांबद्दल जाणून घेऊया.

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना आलेले विचित्र अनुभव

आयुष्मान खुराना 

असाच विचित्र अनुभव आलेला बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना केवळ एक कुशल अभिनेता नाही, तर एक अद्भुत गायक देखील आहे. आयुष्मान न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना एका चाहत्याने त्याच्यावर पैसे फेकले होते. आयुष्मानने ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.

अरिजित सिंग

प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजित सिंग याच्याही कॉन्सर्टमध्ये अनेकांनी त्याच्या अंगावर शर्ट, टिशर्ट असे कपडे फेकल्याचे प्रसंग घडले होते. तेव्हा त्याने देखील ही परिस्थिती हाताळत हसून या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला होता.

पिंक

हॉलिवूडमधल्या अनेक गायकांना तर यापेक्षाही विचित्र अनुभव आले आहेत.गायक पिंकला लंडनमधील एका मैफिलीदरम्यान गर्दीतील एका प्रेक्षकाने अस्थी आणि राखेने भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकून मारली होती.

यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. यावर प्रतिक्रिया देताना गायकाने चाहत्याला विचारले, तेव्हा ती त्या व्यक्तीच्या आईची अस्थी असल्याचे त्याने सांगितले.

लेडी गागा

सुपरस्टार गायिका लेडी गागा टोरंटोमध्ये कार्यक्रम करत असताना तिच्यासोबत एक भयानक घटना घडली. कॉन्सर्ट दरम्यान, कोणीतरी त्याच्यावर एक विचित्र बाहुली फेकली, त्यानंतर तिचे काही चाहते तणावग्रस्त झाले. परंतु, तिने तिचा परफॉर्मन्स सुरूच ठेवला.

शेर लॉयड

2012 मध्ये, जेव्हा गायक शेर लॉयड परफॉर्म करत होता, तेव्हा कोणीतरी तिच्यावर लघवीने भरलेली बाटली फेकली होती. त्यावेळी तिने ताबडतोब परफॉर्म करणे थांबवले. तिला यावेळी प्रचंड राग आला होता. अशी चेष्टा करणे चांगलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

टॉम जोनास

स्टार गायक टॉम जोनास त्याचे प्रसिद्ध गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करत असताना एका महिला चाहत्याने त्याच्यावर पॅन्ट फेकली होती. जॉनने त्याच्या पायानी ती बाजूला सारली आणि अजिबात विचलित न होता आपले गाणे सुरू ठेवले

.ओझी ऑस्बॉर्न

1982 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान, गायक ओझी ऑस्बॉर्नवर एका व्यक्तीने जिवंत वाटवाघुळ फेकले होते. त्याला आधी ते रबराचे खेळणे वाटले आणि त्याने ते तोंडाने चावण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला रेबीज झाल्याचे निदान झाले, ज्यासाठी त्याच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते.

एका परफॉर्मन्सदरम्यान गायिका पिंक चाहत्यांना मनातील भावना सांगत असताना एका चाहत्याने तिच्यावर ३ किलोचे चीज पॅकेट फेकले. हे पाहून तिलाही हसू आवरता आले नव्हते असं तिने म्हटलं आहे.