शाहरुख खान खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतो? आकडा ऐकून थक्क व्हाल

| Updated on: Dec 05, 2024 | 8:03 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान खासगी कार्यक्रमांसाठी किती मोठी रक्कम आकारतो हे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्याने अनेक मोठ्या लग्नांमध्ये परफॉर्म केले आहे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या त्याच्या परफॉर्मचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाहरुख खान खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतो? आकडा ऐकून थक्क व्हाल
Follow us on

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. शाहरूखचे करोडो चाहते आहेत हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. शाहरूखला एकदा भेटण्यासाठी किंवा त्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते धडपडत असतात. तसेच काहीजण तर शाहरूखला कार्यक्रमांनाही गेस्ट म्हणून बोलवतात. शाहरुख खानही अनेकदा खासगी कार्यक्रमांमध्येही परफॉर्म करताना दिसतो.

खासगी कार्यक्रमामधला शाहरुखच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

चित्रपटांसोबतच शाहरुख खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो. अलीकडेच शाहरुखने एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानने पठाण चित्रपटातील झूम जो पठाण या गाण्यावर सादरीकरण केले. त्याचा व्हिडिओ पाहून लोक खूश आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुख खान मीठ आणि मिरचीच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूप कमेंट करत आहेत.

पण शाहरुख एका इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी किंवा एखाद्या खाजगी कार्यक्रमांमध्ये, लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतो हे माहितीये का? याबद्दल थोडं जाणून घेऊयात.

शाहरुख खान खाजगी कार्यक्रमासाठी किती पैसे देतो

एका रिपोर्टनुसार, शाहरुख खान एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये घेतो. शाहरुख अशा अनेक लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म करतो. त्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरलही झालेले आहेत.

शाहरुख अनेकदा आपल्या मित्रमंडळींच्या कार्यक्रमातही परफॉर्म करताना दिसतो.जसं की,त्याने एकदा लक्ष्मी मित्तल यांच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म केलं होतं. ,तसेच भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या मुलीच्या लग्नातही शाहरुखनं डान्स केला होता. तर मुकेश अंबानी यांच्या मुलांच्या लग्नातही शाहरुख डान्स करताना दिसला होता.

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर, शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘किंग’ पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. ‘किंग’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत असून शाहरुख एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या ॲक्शन थ्रिलर सिनेमात त्याची मुलगी सुहाना खानदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत आहे.