Vinod Kambli : विनोद कांबळीने बिग बॉसमधून दर आठवड्याला किती पैसै कमावले ?

| Updated on: Dec 11, 2024 | 3:43 PM

देशातील सर्वात मोठा रिॲलिटी शो असलेला 'बिग बॉस' हा 18 वर्षांपूर्वी टीव्हीवर पहिल्यांदा प्रसारित झाला होता. हा शो फक्त अभिनेते , सेलिब्रिटींपुरता मर्यादित नव्हे तर त्यामध्ये राजकारण्यांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत अनेक सेलिब्रिटीज आत्तापर्यंत सहभागी झाले आहेत. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि श्रीसंत हे देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते.

Vinod Kambli : विनोद कांबळीने बिग बॉसमधून दर आठवड्याला किती पैसै कमावले ?
विनोद कांबळी
Follow us on

भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून याच्या खराब तब्येतीमुळे चर्चेत आहे. रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरण झाले, त्यावेळी त्याची तब्येत पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सचिनची भेट घेतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळीने एमसीएला म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला काम देण्याची विनंती केली होती. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या या निवृत्त क्रिकेटपटूला सध्या बीसीसीआयकडून दरमहा 30,000 रुपयांचे पेन्शन मिळत असून त्यावर तो कशीबशी गुजारणा करत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विनोद कांबळीने अभिनय आणि रिॲलिटी शोमध्ये नशीब आजमावले, पण मनोरंजन क्षेत्रातही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

‘बिग बॉस’च्या सीझन 3मध्ये विनोद कांबळी याने ‘वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट’म्हणून एंट्री केली होती. त्याने त्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात घरात एंट्री केली होती. पण फक्त 14 दिवसांतच त्याचं या रिॲलिटी शोमधून ब2कअप झालं आणि तो घराबाहेर पडला होता. 15 वर्षांपूर्वी सलमान खान नव्हे तर अमिताभ बच्चन हे या शोचे होस्ट होते. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विनोद कांबळीला दर आठवड्याला दीड ते दोन लाख रुपये फी देण्यात आली होती. ही फी त्यावेळच्या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या तुलनेत खूप जास्त असली तरी क्रिकेटपटू एस श्रीशांतच्या तुलनेत ती खूपच कमी होती.

श्रीसंतला किती पैसे मिळाले होते ?

हे सुद्धा वाचा

रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विवादीत खेळाडू श्रीसंत याला दर आठवड्याला 50 लाख रुपये मिळत होते. श्रीशांत फिनालेपर्यंत या शोमध्ये राहिला, पण बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये श्रीशांतचा प्रवेश झाला. त्यावेळी अमिताभ बच्चन नाही तर सलमान खान हाच या शोचा होस्ट होता.

विनोद कांबळीला कमी फी का ?

श्रीसंत आणि विनोद कांबळीची तुलना केली तर विनोद कांबळीला जेव्हा या शोची ऑफर मिळाली तेव्हा तो क्रिकेट सोडून अभिनयाच्या क्षेत्रात स्ट्रगल करत होता. त्यामुळेच तो कमी फी घेऊनही बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास राजी झाला. दुसरीकडे, श्रीसंतच्या काळात बिग बॉस हा खूप मोठा ब्रँड बनला होता आणि श्रीसंतने अनेकदा हा शो नाकारला होता. याच कारणामुळे त्याला या शोमध्ये अधिक पैसे देऊन सहभागी होण्यासाठी मनवण्या्यात आले.

विनोद कांबळी आणि श्रीशांतच्या काळातील बिग बॉस सीझनमधील मोठा फरक म्हणजे बिग बॉसच्या 10व्या सीझनसाठी स्पर्धकांना कमी फी देण्यात यायची आणि विजेत्याला 1 कोटी मिळायचे. मात्र 10 व्या सीझननंतर विजेत्याला मिळणारी रक्कम 50 लाख झाली आणि शोमधील स्पर्धकांची फी वाढवण्यात आली, त्याचा फायदा श्रीसंत याला झाला.