Salman Khan: मी तिला मारल असतं तर तिचा जीव…. ऐश्वर्या रायबद्दल काय म्हणाला सलमान?

| Updated on: May 01, 2023 | 12:57 PM

Salman Khan Aishwarya Rai: सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते कोणापासून लपलेले नाही. या दोघांच्या प्रेमकहाणीपेक्षा त्यांच्या ब्रेकअपबद्दल जास्त चर्चा झाली. आता सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो ऐश्वर्याला थप्पड मारण्याच्या आरोपावर बोलला आहे

Salman Khan: मी तिला मारल असतं तर तिचा जीव....  ऐश्वर्या रायबद्दल काय म्हणाला सलमान?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खानने (Salman Khan) चित्रपटसृष्टीत जवळपास 35 वर्षे पूर्ण केली आहेत. सलमान खानने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. मात्र, चित्रपटांव्यतिरिक्त सलमान त्याच्या लव्ह लाईफमुळेही (Love life) खूप चर्चेत आहे. ऐश्वर्या रायपासून (Aishwarya Rai) कतरिना कैफपर्यंत (Katrina Kaif) सलमान अनेक हाय-प्रोफाइल रिलेशनशिपमुळेही चर्चेत होता. काही वर्षांपूर्वी सलमान ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये होता. एकेकाळी या जोडीचा बॉलीवूडच्या सर्वात सुंदर जोडप्यांच्या यादीत समावेश होता, पण दोघांचे ब्रेकअप झाले. सलमानने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्याने केला होता.

खरं तर, 2002 मध्ये ऐश्वर्या रायने बॉम्बे टाइम्सला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने सलमानसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. मद्यधुंद अवस्थेत सलमानने तिला अनेकवेळा मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्याने केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता सलमान खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने यासंदर्भात धक्कादायक उत्तर दिले आहे.

सलमान खानच्या फॅन क्लबने त्याच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये सलमानला विचारण्यात आले की, तुम्ही कधी एखाद्या महिलेवर हात उचलला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान खान म्हणाला, ‘आता ती जर असं म्हणतं असेल तर माझ्याकडे उत्तर देण्यासारखं काय आहे ? जाऊ द्या… यानंतर सलमानला असा प्रश्नही विचारण्यात आला की, त्याला त्यात पडायचे नाही का? तेव्हा सलमानने उत्तर दिले की, एकदा एका पत्रकाराने मला (मारण्याबद्दल प्रश्न) विचारला होता. मी म्हणालो, ‘ मी जर कोणाला मारलं असेल तर साहजिकच भांडण झालं असेल, मी रागावलो असेन ना.. जर मी तिला मारलं असतं तर ती जगू शकली असती, अस मला वाटत नाही. (मारहाणीचे हे वृत्त) खरं नाही आणि असं का सांगितले गेले हेही मला माहीत नाही’ असे सांगत सलमानने आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे स्पष्ट केले.

1998 साली आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जवळीकीला सुरुवात झाली. या चित्रपटापासून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानंतर सलमान आणि ऐश्वर्याची जोडी ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटात एकत्र दिसली. दोघांच्या ब्रेकअपनंतर हा चित्रपट 2002 मध्ये रिलीज झाला होता. ब्रेकअपनंतर सलमान आणि ऐश्वर्या बराच काळ एकमेकांबद्दल बोलले नाहीत.