Tarla Teaser : हुमा कुरेशी बनली शेफ, तरला दलाल चित्रपटाच्या टीझरनं जिंकलं लोकांचं मन

| Updated on: May 23, 2023 | 9:08 AM

प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांचा शो आणि त्यांची पुस्तकं खूप लोकप्रिय आहेत. लवकरच त्यांचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

Tarla Teaser : हुमा कुरेशी बनली शेफ, तरला दलाल चित्रपटाच्या टीझरनं जिंकलं लोकांचं मन
Image Credit source: instagram
Follow us on

Tarla Teaser Video : हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही अतिशय गुणवान अभिनेत्री असून विविध भूमिकांमधून ती तिचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतवत असते. आता लौकरच ती एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी ती एका शेफच्या (chef) भूमिकेत दिसणार आहे, एक अशा शेफ ज्यांना आपण सर्वजणच चांगले ओळखतो. त्या म्हणजे तरला दलाल. झी5 वर हुमा कुरेशीच्या आगामी चित्रपट तरलाचा (Tarla Teaser Video) टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी सेलिब्रिटी शेफ आणि फूड रायटर तरला दलाल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. हुमा कुरेशीने तिच्या नवीन चित्रपटासह एका चांगल्या कथेचे वचन दिले आहे. सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांनी स्वयंपाकावर शंभरहून अधिक पुस्तके लिहिली, त्यांची पुस्तके महिलांना खूप आवडतात.

तरला दलाल यांनी ‘तरला दलाल शो’ आणि ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ सारखे लोकप्रिय कुकिंग शो होस्ट केले होते. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत असून पियुष गुप्तांनी त्याचे दिग्दर्शन केले तर हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून, असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी परंतु नवशिक्या शेफची प्रेरणादायी कथा आहे, ज्या आपल्या कठोर परिश्रमाने स्वयंपाक तज्ञ आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी बनल्या.

हुमाच्या आईकडेही आहेत तरला दलाल यांची पुस्तकं

तरला या चित्रपटाबद्दल बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, तरला दलाल या मला माझ्या बालपणीची आठवण करून देतत. माझ्या आईने किचनमध्ये त्यांच्या पुस्तकांची एक प्रत ठेवली होती आणि ती माझ्या शाळेच्या टिफिनसाठी त्यांच्या अनेक पाककृती वापरून करून पाहत असे. मला स्पष्टपणे आठवते की मी आईल, तरला यांच्या पाककृतीप्रमाणे घरी बनवलेले मँगो आईस्क्रीम बनवायला मदत केली होती. तरला यांची भूमिका साकारताना मला बालपणीच्या त्या गोड आठवणी परत दिल्या.

77 व्या वर्षी निधन झाले

सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांना 2007 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.