‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बाहुबली फेम सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूडचे आघाडीची नायिका दीपिका पडूकोण यांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरु असून त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते चित्रपटाच्या फर्स्ट शोचे तिकीट ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना देण्यात आले. त्यावेळी कमल हासन यांनी एक किस्सा ऐकविला त्यामुळे सारेच जण अवाक झाले…
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. 19 जून या चित्रपटाचा एक भव्य प्रमोशनल सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास चित्रपटाची स्टारकास्ट अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यांच्यासह कमल हसन उपस्थित होते. या कार्यक्रमात कलाकारांनी शुटींगकाळातील अनेक मजेदार किस्से सांगितले. काही भावनिक क्षणही पाहायला मिळाले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी कमल हसन यांना चित्रपटाच्या पहिल्या शोचे तिकीट दिले. यावेळी कमल हासन यांनी एक किस्सा ऐकविला.
तेलगु सिनेमा इंडस्ट्रीत चित्रपटाच्या फर्स्ट शोचे तिकीट अभिनेत्यांना सन्मानाने देण्याची परंपरा आहे. या सोहळ्यात प्रोड्यूसर अश्विनी दत्त यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचे तिकीट दिले. हे तिकीट बिग बींना कमल हासन यांना दिले. कमल हासन बिग बींच्या हातून सिनेमाचे तिकीट मिळाल्याने खूपच खूश झाले. त्यावेळी एक किस्सा ऐकविला ते म्हणाले की 1975 मध्ये रिलीज झालेल्या शोले या चित्रपटाने इतिहास घडविला होता. या चित्रपटात आपण टेक्निशियन म्हणून काम केले होते असेही त्यांनी सांगितले. शोले चित्रपटाची तिकीटे मिळत नसल्याने हा चित्रपट पाहाण्यासाठी मला तीन आठवडे वाट देखील पाहावी लागली होती अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. कदाचित हा क्षण माझ्या आयुष्यात जर चार-पाच दशकांपूर्वी हा क्षण आला असता, तर जेव्हा मला शोले पाहाण्यासाठी खूप वाट पाहावी लागली होती. मला वाटतं असे अनेक चाहते असतील ज्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी माझ्यासारखी वाट पाहावी लागली असेल. मी कधीही विचार केला नव्हता की मिस्टर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मला फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट मिळेल. तेव्हा मी एक फिल्म टेक्निशियन होतो. आज एक अभिनेता आहे. जास्त काही बदललेलं नाही.’
कमल हासन यांनी यात व्हीलेनचा रोल केला आहे. मी बॅकस्टेज अमितजी यांच्या समोर सांगितले की मला नेहमीच व्हीलनचा रोल करायचा होता. कारण व्हीलनला चित्रपटात सर्व चांगली कामे करायला मिळतात. तर हीरो बिचारा रोमांटिक गाणी म्हणतो आणि हिरोईनची वाट पाहात राहातो. मला वाटले व्हीलेनचा रोल आहे. तर मजा येईल. परंतू दिग्दर्शक नाग अश्विन यांना काही वेगळं करायचं होतं. आणि मी चित्रपटात वाईट विचारांच्या साधु सारखा आहे, असे कमल हासन यांनी हसत सांगितले.