काश.. सलमानचा तो एक चुकीचा सल्ला ऐकला नसता तर गोविंदा आजही असता सुपरस्टार

| Updated on: May 30, 2023 | 4:21 PM

Shocking Story Of Govinda : एक काळ असा होता की गोविंदाने बॉलिवूडवर राज्य केले होते. त्याच्याकडे चित्रपटांची लाईन लागलेली असायची आणि बॉक्स ऑफिसवर फक्त गोविंदाचे नाव असायचे. पण आज तोच गोविंदा मोठा पडद्यावरून गायब आहे, असं का ?

काश.. सलमानचा तो एक चुकीचा सल्ला ऐकला नसता तर गोविंदा आजही असता सुपरस्टार
Follow us on

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदाच्या (Govinda) चाहत्यांची आजही कमतरता नाही. जगभरात जबरदस्त छाप पाडणाऱ्या गोविंदाने आतापर्यंत 165 हून अधिक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ॲक्शनपासून कॉमेडीपर्यंत प्रत्येक पात्राने गोविंदाने प्रेक्षकांची मने जिंकली, पण पाहता पाहता तो चित्रपटांपासून दूरच गेला.

खरंतर, गोविंदाच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात. असे म्हटले जाते की, गोविंदाची कारकीर्द जेव्हा खूप भरात होती तेव्हा तो सेटवर खूप उशिरा यायचा. राजकारणात प्रवेश केल्यानंतर जेव्हा त्याला चित्रपटांमध्ये परत यायचे होते, तेव्हा त्यांच्यासोबत चित्रपट करण्याची कोणालाच इच्छा नव्हती, असेही म्हटले जाते. दुसरीकडे, गोविंदाच्या 1 मोठ्या चुकीमुळे त्याच्या करिअरचा आलेख खाली घसरायला लागला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गोविंदा आणि सलमान खानमध्ये खूप चांगली मैत्री होती आणि 1997 मध्ये गोविंदा ‘जुडवा’ नावाचा चित्रपट करत होता. होय, तुम्ही बरोबर ऐकले, तोच ‘जुडवा’ ज्यामध्ये सलमान नंतर दुहेरी भूमिकेत दिसला होता. खरे तर असे झाले की गोविंदाने आधीच ‘जुडवा’ चित्रपट साइन केला होता आणि चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते. मात्र शूटिंग सुरू असतानाच, सलमानने गोविंदाला चित्रपट सोडण्यास सांगितले आणि गोविंदाने क्षणार्धात होकार दिला आणि चित्रपट करण्यास नकार दिला. गोविंदाने येथे एक मोठी चूक केली, कारण या चित्रपटात नंतर सलमानने काम केलं आणि हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

‘जुडवा’ चित्रपटानंतर सलमानची गाडी अशा रुळावर धावू लागली की, तो अजूनही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. दुसरीकडे, गोविंदाने हा चित्रपट सोडताच त्याचे नशीबही त्याला सोडून गेले आणि 1997 पूर्वी गोविंदाचा इंडस्ट्रीमध्ये जो दर्जा होता, तो 1997 नंतर हळूहळू कमी होऊ लागला आणि त्याचे करिअर डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले. आणि आज तो बॉलिवूडपासून दूर आहे.