मुंबई : बर्फी, रेड, अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी, गोड चेहऱ्याची बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D’cruz) सध्या खूप चर्चेत आहे. इलियानाने गरोदर असल्याची घोषणा केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर (instagram) फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर (social media)तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने फोटो पोस्ट केल्यानंतर सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. लग्नाआधी इलियाना गरोदर असल्यामुळे चर्चांचा उधाण आलं आहे.
मात्र ती काही अशी पहिलीची अभिनेत्री किंवा महिला नाही. यापूर्वीही अनेक महिला, अनेक अभिनेत्री लग्नाआधी किंवा लग्न न करता गरोदर राहिल्या होत्या. त्यावेळीही या विषयावर खूप चर्चा झाली. पण त्या अभिनेत्रींनी आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करत ट्रोलर्सकडे लक्ष दिले नाही. या यादीत अनेक अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
आलिया भट्ट
सध्याच्या काळातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर अभिनेत्री आलिया भट्टने गुड न्यूज देत लवकरच आई होणार असल्याची पोष्ट शेअर केली होती. अनेक सेलिब्रेटींनी, चाहत्यांनी रणबीर- आलियाचे पॉवर कपलचे अभिनंदन केले.
श्रीदेवी
1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर श्रीदेवीने राज्य केले. भारतीय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्याशी तिचे अफेअर होते व तेव्हा तिने लग्नापूर्वी प्रेग्नन्सीच्या बातम्यांना पुष्टी दिली होती. नंतर 1996 मध्ये बोनी कपूर व श्रीदेवी यांनी लग्न केले. तिचे सौंदर्य व अप्रतिम अभिनय यासाठी श्रीदेवी प्रसिद्ध होती.
कोंकणा सेन शर्मा
राष्ट्रीय पुरस्कार विजेती कोंकणा सेन शर्मा ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मिस्टर अँड मिसेस अय्यर (2002), ओंकारा (2006), वेक अप सिड (2009), लाइफ इन अ मेट्रो, पेज थ्री अशा चित्रपटातील कामांसाठी तिची खूप प्रशंसाही झाली. कोंकणा लग्नापूर्वी अभिनेता रणवीर शौरीला डेट करत होती आणि 2010 मध्ये त्यांनी लग्न केले, काही महिन्यांनंतर त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली. काही वर्षांनी ते दोघे वेगळे झाले.
नीना गुप्ता
इतिहासातील दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता 1980 मध्ये त्यांच्या हाय प्रोफाइल अफेअरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. नीना यांनी मसाबा गुप्ता 1989 साली जन्म दिला. विव रिचर्ड्सचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. नीना गुप्ता यांनी खूप वर्षांनी बिझनेसमन विवेक मेहरासोबत लग्न केले. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी नीना गुप्ता खूप प्रसिद्ध आहेत.
सारिका
सारिका यांचे मेगास्टार कमल हसन यांच्याशी प्रेमसंबंध होते आणि त्यांनी 1988 मध्ये लग्न केले. पण त्यापूर्वीच 1986 साली श्रुतीचा जन्म झाला. सारिका व कमल हसना या दोघांना अक्षरा हसन ही आणखी एक मुलगी आहे. तिने बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही पदार्पण केले होते. कमल हसन आणि सारिका 2004 साली वेगळे झाले.
सेलिना जेटली
सेलिनाने लग्नाआधी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, नो एंट्री, अपना सपना मनी मनी आणि गोलमाल रिटर्न या चित्रपटांमधील तिची भूमिका खूप गाजली. 2011 मध्ये तिने दुबईस्थित बिझनेसमन पीटर हागसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर 2012 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.
नताशा
मूळची सर्बिया येथील असलेली अभिनेत्री नताशा हिने 1 जानेवारी 2020 रोजी भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी लग्न केले. तेव्हा ती गरोदर होती. 29 जुलै रोजी तिने एका मुलाला जन्म दिला.
दिया मिर्झा
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झाने 2019 मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. तर फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईस्थित व्यापारी वैभव रेखीशी लग्न केले, लग्नानंतर दीड महिन्यानंतर तिने प्रेग्नन्सीची बातमी जाहीर केली.