Ileana D’Cruz Pregnancy : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) जेव्हापासून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे, तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. या प्रवासातील काही क्षण , फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांशी शेअर करत असते. इलियानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची माहिती दिली. पण बाळाचा बाप कोण हे तिने बराच काळ सांगितलं नव्हतं. अखेर काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला होता.
बेबी बंपचा फोटो केला शेअर
इलियाना सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असून तिने नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे. लाल रंगाच्या ग्लॅमरसमध्ये सुंदर दिसणाऱ्या इलियानाने तिचे बेबी बंपही फ्लाँट केले आणि त्याचे क्यूट नावही सांगितले.
इलियानाने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तेव्हापासून अभिनेत्री तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत आहे. आता नुकताच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉट रेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबत इलियानाने कलिंगडाची इमोजी शेअर करत ‘माय लिटिल’ असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून लोकांनी तिला मुलगा होणार की मुलगी याचा अंदाज लावायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ नक्कीच मुलगी होणार.’
इलियानाने काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्लर फोटो शेअर करत प्रेग्नन्सीबद्दल एक नोट लिहीली होती. ” गरोदरपणा, ही खूप सुंदर भावना आहे ” असेही तिने म्हटलं होतं.