सुंदर अभिनेत्यात ऋतिक रोशनचं नाव आतापपर्यंत घेतले जात होते. एकेकाळी त्याला बॉलीवूडची ‘ग्रीक देवता’म्हटले जात होते. रणबीर कपूर आणि सलमान खानवर अनेक तरुणी फिदा असतात. काही वर्षांपूर्वी जगातील हॅण्डसम पुरुषांच्या यादी सलमान खान याचा समावेश केला जात होता. 58 वर्षांचा सलमान खान याला आजही चाहते जीवापाड प्रेम करतात. परंतू आता एका सायण्टीफिक स्डडी नुसार दोन्ही स्टार जगातील टॉप 10 हॅंडसम मॅनच्या यादीत बसत नाहीत. या यादीत आता केवळ एका भारतीय स्टारला जागा मिळाली. ज्याला एकेकाळी एका बॉलीवूड दिग्दर्शकाने कुरुप म्हणून हिणवले होते.
जगातील टॉप 10 हॅण्डसम मॅनच्या यादीत केवळ एका भारतीयाचा समावेश झाला आहे. आणि तो बॉलिवूडचा एक सुपरस्टार आहे.गेली तीस वर्षे तो इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर राज्य करीत आहे. त्याला कधीकाळी कुरुप देखील म्हटले जात होते. परंतू आता हा अभिनेता जगातील सर्वात सुंदर दहा हॅण्डसम मॅनच्या यादीत समाविष्ट झालेला एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.तो दुसरा तिसरा कोणी नसून रोमान्सचा किंग शाहरुख खान आहे.
सेलिब्रिटी प्लास्टीक सर्जन डॉ.ज्युलियन डी सिल्वा यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या शास्रीय संशोधना नुसार ब्रॅंड पिट वा टॉम क्रुझ नव्हे तर एरोन टेलर – जॉनसन जगातील सर्वात सुंदर पुरुष आहेत. त्यांनीच या यादीत शाहरुख खानला दहावे स्थान दिले आहे. डॉ. ज्युलियन यांनी सौदर्याची नवीन व्याख्या करण्यासाठी ‘ग्रीक गोल्डन रेशियो ऑफ ब्यूटीफाय’ तंत्राचा वापर करुन चेहऱ्याच्या आकार आणि परफेक्शनचा अभ्यास केला आहे. याचे मापन करण्यासाठी एडव्हान्स फेस मॅपिंग सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. विविध चेहऱ्यांची ठेवण गोल्डन रेशिओच्या किती अनुरुप आहे त्यानुसार त्यांनी निवड केली आहे. गोल्डन रेशिओ नुसार सौदर्य मोजण्यासाठी कला आणि डिझाईनमध्ये वापरण्यात येणारा एक फॉम्युर्ला आहे. जस्टजेरेडच्या रिपोर्टनुसार गोल्ड रेशिओ चेहऱ्याचे सिमेट्रीचे मापन करतो. ज्यामुळे कोणाही व्यक्तीच्या शारीरिक विशेषतेचे परपेक्शन समजते.