हार्दिक पांड्याच नव्हे हा क्रिकेटर देखील जस्मिन वालियाला करतो फॉलो, नताशा स्टेनकोव्हिक बद्दल…

| Updated on: Aug 15, 2024 | 11:36 AM

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघेही विभक्त झाले असून नताशा मुलासोबत तिच्या घरी परतली आहे.

हार्दिक पांड्याच नव्हे हा क्रिकेटर देखील जस्मिन वालियाला करतो फॉलो, नताशा स्टेनकोव्हिक बद्दल...
Follow us on

भारतीय संघातील खेळाडू हार्दिक पांड्या चर्चेत असतो.कधी खेळामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो लाईमलाइटमध्ये असतो. आता तो पुन्हा एकदा पर्सनल लाईफमुळेच चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर सध्या हार्दिक सिंगल आहे. दोघांनी सोशल मीडियावर ही बातमी जाहीर केल्यानंतर नताशा तिच्या मायदेशी परतली आहे. मात्र आता आता हार्दिकच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने प्रवेश केल्याचे दिसत असून त्याचे नाव टीव्ही पर्सनॅलिटी जस्मिन वालियाशी जोडले जात आहे. एवढंच नव्हे तर दोघांनी नुकत्याच सुट्ट्या देखील एकत्र घालवल्याचे सांगितले जाते.

जस्मिन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. मात्र तिला फॉलो करणारा हार्दिक पांड्या हा एकमेव क्रिकेटर नाही. इतर क्रिकेटपटूही तिला फॉलो करतात.

हार्दिक-नताशा झाले विभक्त

हार्दिक पांड्याने काही काळापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. तो आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक वेगळे झाल्याचे त्याने जाहीर केले. त्यानतंर नताशा ही मुलासोबत सर्बियाला परतली. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या त्याच्या नवीन गर्लफ्रेंडसोबत ग्रीसमध्ये आहे.

ब्राव्हो देखील जस्मिनला करतो फॉलो

हार्दिकचं सध्या जिच्या सोबत नाव जोडलं जातंय ती फेमस आहे. जस्मिन वालिया ही ब्रिटिश प्रसिद्ध गायिका आहे. जस्मिनचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. पण तिला खरी ओळख ही एका टीव्ही मालिकेपासून मिळाली. 2014 साली जस्मिन वालिया हिने आपले स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले. त्यानंतर तिने आपला मोर्चा हा सिंगिंगकडे वळवला. एवढंच नव्हे तर जस्मिन वालिया हिने बॉलिवूडचे एक गाणे देखील म्हटले आहे. तिचे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.मात्र तिच्या फॉलोअर्समध्ये फक्त हार्दिक पांड्याच नव्हे तर इतरही क्रिकेटपटू आहे. वेस्टइंडीजचा माजी खेळाडू डॅरेन ब्राव्हो हाही जस्मिनला फॉलो करतो. मात्र जस्मिन काही त्याला फॉलो करत नाही, ती फक्त हार्दिक पांड्या यालाच फॉलो करते.

नताशाबद्दल चाहत्यांना वाटत्ये सहानुभूती

जास्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या यांच्या नात्याच्या अफवा पसरल्यानंतर चाहत्यांना नताशा स्टॅनकोविकबद्दल सहानुभूती वाटत आहेत. तशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर आहेत. त्याद्वारे चाहते तिची माफी मागत आहेत. काही यूजर्सनी लिहिले की ही हार्दिक पांड्याची चूक होती. हार्दिक पांड्याच्या पोस्टवर एका यूजरने कमेंट्दवारे विचारलं की, ‘तू एवढ्या लवकर मूव्ह ऑन कसं केलंस?’ तर काहींनी त्याला त्याच्या मुलाकडे जाण्याचा सल्ला दिला.