मुंबई : सध्या प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’चा 12 सीझन (Indian Idol 12) सुरु आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमध्ये अहमदनगरची गायिक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. इतकेच नव्हे तर, ‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प पर्वाची ती विजेती देखील ठरली होती. तीचा हा प्रवास अतिशय खडतर होता (Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey).
‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प या शोमध्ये अंजलीची बहीण नंदीनीनेही सहभाग घेतला होता. पण दुर्दैवाने ती शोच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नव्हती. लिटील चॅम्पस शो सुरु झाला तेव्हापासून अंजली ही ‘टॉप 5’मध्ये होती. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि जावेद अली व्यतिरीक्त 30 सदस्यीय ज्युरींनी हा शो जज केला होता. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती.
(Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey)
आपल्या संगीत प्रवासाविषयी सांगताना अंजली म्हणते, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहेत. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. माझी बहिण नंदिनी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या ताईला बघूनच या क्षेत्रात आले (Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey).
जयपूर येथील एका स्टुडिओमध्ये ‘सारेगामापा’चा ग्रँड फिनाले पार पडला होता. या मध्ये अंजलीने 6 स्पर्धकांना मागे टाकत हा मानाचा किताब आपल्या नावे केला होता. या शोमध्ये एक नाही तर दोन स्पर्धकांना विजेता घोषित करण्यात आले होते. सारेगमपच्या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले होते. अंजलीसोबतच श्रेयण भट्टाचार्य हाही लिटील चॅम्पसचा विजेता ठरला होता. फिनालेमध्ये श्रेयणने ‘हवाएं’, ‘सूरज डूबा’ आणि ‘जालिमा’ यासारखी गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले होते, तर अंजलीने ‘दीवानी मस्तानी’, ‘झल्ला वल्ला’ ‘मैं कोल्हापुर से आई हूं’ ही शानदार गाणी गायली होती.
उल्लेखनीय म्हणजे, अंजलीने तिच्या सुमधुर आवाजाने अल्पावधीत सर्वांची मने जिंकली होती. वाईल्ड कार्ड इंट्री घेऊन आलेली नंदीनीने काही दिवसांतच स्वतःमधील टॅलेंट सगळ्यांना दाखवून दिले होते. शोमध्ये अंजलीची बहीण नंदिनी अगोदरच शोमधून आऊट झाली होती. आता अंजली ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर अंजली आपल्या गाण्याची चुणूक पुन्हा दाखवून देत आहे. आपल्याला गायनाने अंजलीने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
(Indian Idol 12 Fame singer Anjali Gaikwad journey)
Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!