मुंबई : इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) चा कालचा भाग खास ठरलाय. या भागासाठी कुमार सानू (Kumar Sanu) आणि अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) उपस्थित होते. दरम्यान प्रत्येक स्पर्धकानं रोमँटिक परफॉर्मन्स दिलेत. तर शेवटचा परफॉर्मन्स सवाई भट्ट आणि आरतीनं दिला. आरती आणि सवाईच्या गाण्याचं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल या दोघांनी कौतुकही केलं. मात्र, परफॉर्मन्सनंतर कुमार सानू यांनी सवाईला विचारलं की तुमची गर्लफ्रेन्ड आहे का? या प्रश्नाचं सवाईनं नाही असं उत्तर दिलं.
दानिशनं सवाईबद्दल केला खुलासा
त्यानंतर लगेच दानिशनं उत्तर दिलं. दानिश म्हणाला, सवाई माझा रूममेट आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मी त्याला व्हिडीओ कॉलमध्ये जास्त बघतो. मग कुमार सानू विचारतात की कोणी चीनी आहे का? त्यावर सवाई लाजतो आणि म्हणतो की नाही जपानी आहे. सवाईच्या उत्तरानं सर्वांनाच धक्का बसला. नंतर सवाई जपानी भाषेत काहीतरी बोलला, जे ऐकून प्रत्येकजण हसला.
सवाई नंतर म्हणतो, ‘सर इंडियन आयडॉल हा एक मोठा कार्यक्रम आहे, प्रत्येकजण तो पाहतो. त्यामुळे काही मित्र झाले आहेत. कधीकधी व्हिडीओ कॉल येतो.” शेवटी, सोनू म्हणतात, संगीताला कोणतीही भाषा नसते, तुझ्याकडे संगीताची जपानी भाषा आहे. सवाई नंतर तिथून लाजून निघून गेला.
षण्मुखप्रियाला काढून टाकण्याची मागणी
गेल्या आठवड्यात इंडियन आयडॉल 12मध्ये दिवंगत दिग्गज संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्यामध्ये श्रवण राठोड यांच्या गाण्यांवर स्पर्धकांनी ड्यूएट सादर केल्या. स्पर्धक आशिष याच्यासमवेत ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ या गाण्यावर षण्मुखप्रियाने गाणे सादर केले. हे गाणे कोणत्याही चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही आणि षण्मुखप्रियाला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले- ‘षण्मुखप्रिया सर्वात निरुपयोगी स्पर्धक आहेत, शो सोडा आणि निघून जा. इंडियन आयडॉल 12 थांबवा. आदित्य नारायण कोणत्याही सबबी देऊ नका.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘षण्मुखप्रिया फक्त किंचाळत आहे, धुन नाही, कॉपी कॅट आहे. ती मधुर गाणी गाऊच शकत नाही. गाणे कसे ओरडावे आणि कसे खराब करावे हेच फक्त तिला माहिती आहे.’
संबंधित बातम्या
Janta Darbar: आता सोनू सूदच्या इमारतीखालीच ‘जनता दरबार’, मदतीसाठी लोकांची धडपड