मुंबई : नृत्य हे एक असं माध्यम आहे ज्याद्वारे लोक त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात. UNESCO ने 29 एप्रिल 1982 रोजी जगाची खास शैली एका खास दिवसाद्वारे साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. नृत्य सुधारक, महान नर्तक जीन-जॉर्जेस नवरे यांच्या स्मरणार्थ हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस सुरू करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना त्याच्या कला गुणांची जाणीव करून देणे.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामाने 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आयटीआय ही युनेस्कोच्या परफॉर्मिंग आर्ट्सची भागीदार होती. त्याच वेळी,डान्स डे साजरा करण्यासाठी 29 एप्रिल हाच दिवस का निवडला गेला, याबद्दल जर आपण इतिसाहात डोकावून पाहिलं तर 29 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन, आधुनिक बॅलेचे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्रे यांच्या सन्मानार्थ ITI ने हा दिवस निवडला.
या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी जीन जॉर्जेस नोव्हरे यांचा वाढदिवस आहे. अशावेळी त्यांच्या जयंतीनिमित्त नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपले नृत्य कौशल्य जगासमोर ठेवतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश नृत्याच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि नृत्य कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवणे, असे मानले जाते. जगातल्या काही ठिकाणी हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो.
जॉर्जेस हा एक फ्रेंच डान्सर होता जो नृत्यनाटिकेत निपुण होता. त्यांनी त्यांच्या पुस्तकात नृत्यातील अनेक बारकावे लिहिले आहेत.याशिवाय यांनी लेट्स मीट द बॅलेट नावाचे आणखी एक पुस्तक लिहिले. भारतात प्राचीन काळापासून नृत्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. भगवान शिवानेही तांडव सादर केले जे नृत्याचा एक प्रकार बनले.
भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक लोकनृत्ये प्रचलित आहेत. ज्यामध्ये भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, कथक, कथकली, बिहू, छाऊ असे काही लोकप्रिय नृत्य प्रकार आहेत. या नृत्यांना लोकप्रिय करण्याचे श्रेय काही लोकप्रिय नर्तकांना (डान्सर) जातं, ज्यांनी जगभरात नृत्याचे काही प्रकार पोहोचवले.
या सर्व नर्तकांनी जगभर आपलं नाव कमावलं असलं तरी नृत्याच्या प्रकारांना एक वेगळी ओळख दिली आहे. पण जगाच्या कानाकोपऱ्यात अजूनही नृत्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. भारतातही लोक हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यास कचरतात.