अनन्या पांडेची सलग 4 तास कसून चौकशी, समीर वानखेडे, महिला अधिकाऱ्याने विचारले प्रश्न, आता पुढे काय ?

| Updated on: Oct 22, 2021 | 7:01 PM

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली.

अनन्या पांडेची सलग 4 तास कसून चौकशी, समीर वानखेडे, महिला अधिकाऱ्याने विचारले प्रश्न, आता पुढे काय ?
ANANYA PANDEY
Follow us on

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसबीच्या कार्यालयातून संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली असून तिला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगविषयी प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळतेय.

आर्यन खानशी झालेल्या चॅटिंगसंदर्भात चौकशी

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीत अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी अनन्या पांडेचा ड्रग्जसंदर्भात चॅटिंच्या माध्यमातून संवाद झाल्याचा संशय एनसीबीला आहे. एनसीबीतर्फे अनन्याची साधारण चार तास चौकशी करण्यात आली.

स्पष्टीकरण देण्यासाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले

अनन्या पांडेची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. साधारण अडीच वाजता तिची चौकशी सुरु करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान तसेच अनन्या पांडे याच्यात गांजाची तजविज करण्यासंदर्भात व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले होते. तशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण देण्यासाठी तिला एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. साधारणत: साडे तीन ते चार तास ही चौकशी चालली. या चौकशीत एनसीबीने अनन्याला नेमके कोणते प्रश्न विचारले, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण आर्यन तसेच अनन्या यांच्यात व्हॉट्सअ‌ॅपवर जो संवाद झाला त्याविषयीच विचारणा झाल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी गुरुवारी झाली चौकशी 

गुरुवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, मी व्यवस्था करीन. याच संवादावर अनन्याने गुरुवारी स्पष्टीकरण दिले. अनन्याने एनसीबीला सांगितसे की ती फक्त विनोद करत होती. आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही, असे अनन्याने गुरुवारी एनसीबीला सांगितले होते.

 

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.

एनसीबी पुढे काय करणार ?

दरम्यान, आज सूर्यास्त झाल्यामुळे अनन्या पांडेची चौकशी संपली. साधारण चार तास ही चौकशी करण्यात आली. अनन्याने एनसीबीला काय उत्तरं दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच एनसीबी अनन्याला पुन्हा एकदा समन्स पाठवणार का ? तसेच एनसीबी यानंतर कोणता पवित्रा घेणार ? या गोष्टी आगामी काळात स्पष्ट होतील.

इतर बातम्या :

मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द, कारण काय?; पुढचा मेळावा कधी?

‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात

एखाद्या वाहनाच्या चार्जिंगला चार तास लागले तर इतरांनी झोपा काढायच्या का?; अजितदादांचा सवाल

(interrogation of ananya pandey related to conversation with aryan khan by ncb is over today)