मेट गाला 2024 मध्ये, अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानीने पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त लुकने चाहत्यांची मने जिंकली. या मोठ्या इव्हेंटमध्ये ईशा अंबानी हिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्राने डिझाईन केलेला गोल्डन ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा लूक स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ अदजानियाने स्टाईल केला होता. मेट गालामध्ये ईशा अंबानीच्या गॉर्जियस लूकमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
ईशाचा सुपर स्टनिंग लूक
ईशा अंबानी हिचा हा साडी-गाऊन खास मेट गाला 2024 ची थीम ‘The Garden of Time’ या नुसार तयार करण्यात आला आहे. तिचा सुंदर पेहराव कार्यक्रमाच्या थीमला अप्रतिम रीतीने पूरक ठरलाय कारण ही थीम लक्षात घेऊन ईशा अंबानीच्या या कस्टम लूकमध्ये निसर्ग आणि जीवनचक्राचा समावेश करण्यात आला आहे. ईशा अंबानीच्या सोनेरी चमकदार गाऊनला एक लांब ट्रेन जोडलेली आहे, ज्यावर हेवी बहुरंगी फ्लोरल पॅच वर्क आहे, ज्यामुळे तिच्या ड्रेसला ड्रिमी टच मिळालाय.
तिच्या या सुंदर ड्रेससोबत घातलेले दागिनेही अप्रतिम आहेत. या गाऊनसह तिने चोक स्टाइल नेकलेस आणि मॅचिंग कानातले परिधान केले. ग्लोईंग मेकअपसह ईशा खूप सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेसप्रमाणेच तिचे दागिनेही अप्रतिम होते.
फुलं – फुलपाखरांनी सजला ड्रेस
अनाइता श्रॉफ अदजानियाने इंस्टाग्रामवर ईशा अंबानीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये ड्रेसची माहितीही शेअर केली आहे. मेट गालासाठी ईशा अंबानीचा हा ड्रेस हँड एम्ब्रॉयडरीच्या सहाय्याने बनवण्यात आला आहे. तो तयार करण्यासाठी 10,000 तास लागले. हा ड्रेस फुलं, फुलपाखरे आणि ड्रॅगनफ्लायसह सजवला आहे. ड्रेसवर विविध प्रकारच्या कारागिरीने भरतकाम करण्यात आले आहे. यात जरदोसी, नक्षी, फरीशा आणि दब्के कामाचा समावेश आहे. शेकडो स्थानिक कारागीर आणि विणकरांच्या मदतीने हा गाऊन तयार करण्यात आला आहे.
मेट गालामध्ये ईशाने कधी केलं पदार्पण ?
ईशा अंबानीने 2017 मध्ये मेट गालामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, ती 2019 आणि 2023 साली मेट गाला इव्हेंटमध्ये देखील सहभागी झाली. ईशा अंबानी नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या फॅशन सेन्सने प्रभावित करते. यावेळचा तिचा लूकही लोकांना खूप आवडला.