9 लाखांचे पेन, 51 लाखांचे घड्याळ… जया बच्चन यांची प्रॉपर्टी किती?; अमिताभ, हेमा मालिनींनाही टाकले मागे…

| Updated on: Feb 15, 2024 | 1:19 PM

गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या जया बच्चन राजकारणातही अनेक वर्षांपासून आहेत. त्यांनी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यांची संपत्ती ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल.

9 लाखांचे पेन, 51 लाखांचे घड्याळ... जया बच्चन यांची प्रॉपर्टी किती?; अमिताभ, हेमा मालिनींनाही टाकले मागे...
Follow us on

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल जाणून घेण्याची सामान्य लोकांना उत्सुकता असते. बच्चन कुटुंब तर सगळ्यांचं लाडकं, त्यांच्या जीवनाबद्दलही लोक उत्सुक असतात.चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची पत्नी , जया बच्चन या त्यांच्या कामासासोबत राजकीय कारकिर्दीसाठीदेखील ओळखल्या जाततात. त्या आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात झळकल्या होत्या. त्याचं काम पाहून चाहते इंप्रेस झाले. मात्र चित्रपटातील त्यांची रागीट आजी पाहून अनेकांना जया बच्चन यांचं पापाराझींना रागावणं आठवलं. गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या जया बच्चन राजकारणातही अनेक वर्षांपासून आहेत. त्यांनी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यांची संपत्ती ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल.

जया बच्चन आहेत कोट्यवधींची मालक

जया बच्चन यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती की, त्यांच्याकडे एकूण 10.01 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे पत्र त्यांनी 2018 मध्ये दाखल केले होते. जया बच्चन यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे नऊ लाखांचे पेन आणि 51 लाखांचे घड्याळे असल्याचेही सांगितले होते. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 3.4 कोटी रुपयांची घड्याळे आहेत. जया यांच्याकडे एकच कार आहे. 2018 च्या प्रतिज्ञापत्रात जया बच्चन यांच्याकडे 2 कोटी रुपयांची टाटा क्वालिस असल्याची माहिती देण्यात आली होती. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 3 कोटी रुपयांची रोल्स रॉयस आणि 2 कोटी रुपयांच्या मर्सिडीज बेंझसह एकूण 11 गाड्या आहेत.

जया बच्चन यांच्याकडे जमीन किती ?

जया बच्चन यांनी निवासी मालमत्तेचा तपशीलही शेअर केला होता. त्यांनी सांगितले होते की, बिग बी आणि त्यांच्याकडे भोपाळ, नोएडा, दिल्ली, पुणे, गांधीनगर आणि मुंबई शिवाय फ्रान्समधील ब्रोगन प्लेस येथे 3,175 चौरस मीटरची निवासी मालमत्ता आहे. जया बच्चन यांच्याकडे काकोरी, लखनौ येथे 1.22 हेक्टर शेतजमीन आहे ज्याची किंमत 2.2 कोटी रुपये आहे.

ड्रीमगर्ल हेमा मालिनीपेक्षाही जास्त संपत्ती

ड्रीमगर्ल हेमा मालिनी याही राजकारणात सक्रीय असून त्यांनी 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी 114 कोटी रुपये त्यांचे आणि 135 कोटी रुपये पती धर्मेंद्र यांचे आहेत.

जया बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या नुकत्याच रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये दिसल्या होत्या. त्यांच्याकडे अजूनही अनेक चित्रपट आहेत. जया बच्चन नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळेही त्या ट्रोल झाल्या आहेत.