“तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केला का?” जया बच्चन यांच्याकडून कामराचे समर्थन अन् थेट एकनाथ शिंदेंना सवाल

| Updated on: Mar 24, 2025 | 5:46 PM

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे निर्माण झालेल्या वादावर जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कामराला पाठिंबा दिला असून एकनाथ शिंदेंवरही काही सवाल उपस्थित केले आहेत.

तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केला का? जया बच्चन यांच्याकडून कामराचे समर्थन अन् थेट एकनाथ शिंदेंना सवाल
Row, support and freedom of speech debate
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामराने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर एक टीका केली आहे. जाणूनबुजून अपमानित करण्याचा आणि मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करू नये. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कामराने माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्याच्याकडून केली जात आहे. आता कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर एक मोठा वाद निर्माण झाला आहे.

कुणाल कामराच्या वादावार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

मात्र आता या वादावर जया बच्चन यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून जया बच्चन यांनी कामराला पाठिंबा दिला आहे. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे आता अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही बोलल्या आहेत.

कुणाल कामराने हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान शिवसेना युवा शाखेच्या सदस्यांनी हल्ला केला. शो बंद करण्यात आला आणि सेटची तोडफोडही करण्यात आली. आता या प्रकरणात केलेल्या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुणाल कामराबद्दल जया बच्चन काय म्हणाल्या?

जया बच्चन यांनी या मुद्द्यावर संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘जर बोलण्यावर बंदी असेल तर तुमचे काय होईल?’ तसही तुमची परिस्थिती वाईट आहे. जर तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त काही विशिष्ट विषयांवर बोलण्यास सांगितलं जात असेल आणि काही प्रश्न विचारू नका असंही सांगितलं जात असेल, तर यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे?”


एकनाथ शिंदेंसाठी जया बच्चन यांनी काय प्रश्न उपस्थित केला

जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘एखाद्यावर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाच असते जेव्हा काही गोंधल होतो जसं की विरोधकांना मारहाण करणे, महिलांसोबत वाईट वागणे, लोकांची हत्या करणे, अजून काय? तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा मूळ पक्ष सोडून फक्त सत्तेसाठी दुसरा पक्ष स्थापन केला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

कुणाल कामराला कोणताही पश्चात्ताप नाही

खार पोलिस उपनिरीक्षक विजय यांच्या मते, कुणाल कामराच्या ‘नया भारत स्पेशल’ चित्रपटाच्या रिलीजनंतर हा हल्ला झाला. विनोदी कलाकाराच्या वक्तव्याबद्दल आणि तोडफोडीबद्दल युवा विंगच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आणि आता बातमी अशी आहे की सुमारे 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी, कुणाल कामरानेही याबाबत त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.