ऐश्वर्या-अभिषेकसोबत असलेल्या जया बच्चन कोणावर चिडल्या? रागातच एअरपोर्टबाहेर आलेल्या दिसल्या

| Updated on: Jan 05, 2025 | 12:10 PM

बच्चन कुटुंब नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फिरायला गेले होते. पूर्ण बच्चन फॅमिलीच व्हेकेशनवर होते . नुकतेच ते मुंबईत परत आले. यावेळी जया बच्चन रागातच एअरपोर्टच्या बाहेर आलेल्या दिसल्या. सर्वजण आनंदी असताना नेमकं जया बच्चन यांना कोणाचा राग आला?

ऐश्वर्या-अभिषेकसोबत असलेल्या जया बच्चन कोणावर चिडल्या? रागातच एअरपोर्टबाहेर आलेल्या दिसल्या
Follow us on

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. मात्र त्यांच्या अनेक फोटो आणि व्हिडीओवरून त्याच्यांत सर्व अलबेल असलेलं पाहायला मिळतं.

दरम्यान नुकताच ऐश्वर्या आणि अभिषेकचा आराध्यसोबतचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला. ऐश्वर्या आणि अभिषेक लेक आराध्याबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फिरायला गेले होते. पूर्ण बच्चन फॅमिलीच व्हेकेशनवर होते . नुकतेच ते मुंबईत परत आले.

जया बच्चन कोणावर चिडल्या?

मात्र त्यातच आता जया बच्चन यांचाही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्या फारच चिडलेल्या दिसत आहेत. तसेच जया बच्चन या देखील एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात अलबेल असलं तरीही जया बच्चन यांना नेमका कसला राग आलाय असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अनेकदा जया बच्चन कॅमेऱ्यासमोर नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणावरून पापाराझींवर किंवा फॅन्सवर रागावताना दिसतात. असे कित्येक त्यांचे व्हिडिओ व्हायरलही झालेले आहेत. यावेळीही असाच काहीसा प्रकार जया बच्चन यांच्याबाबतीला समोर आला आहे.

 जया बच्चन रागात एअरपोर्टच्या बाहेर आल्या

जया बच्चन जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही होते. बच्चन कुटुंब नुकतेच मुंबईत परतले एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये जया बच्चन फार रागात दिसत होत्या. खरंतर त्या त्यांच्याच स्टाफमधील एका सदस्यावर रागावताना दिसल्या.

 

दरम्यान जया बच्चन यांच्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झालाय पण सोबतच ऐश्वर्या राय आणि अभिषेकसोबत आराध्याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आधी अभिषेक हा विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या देखील बाहेर पडत आहेत.

जया बच्चन यांच्यानंतर आराध्याचाही व्हिडीओ व्हायरल

पापाराझींना नववर्षाच्या शुभेच्छा देताना तिघेही हसत हसत कारकडे जाताना दिसतात. पण तेवढ्याच आराध्या अचानक उडी मारते. ते पाहून ऐश्वर्या देखील घाबरते. ती आराध्याला काय झालं असं विचारते त्यावर आराध्या हसू लागते.आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक शूजित सरकार यांच्या आय वॉन्ट टू टॉक (2024) या चित्रपटात मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसला होता.

त्यानंतर त्याचा हाऊसफुल 5 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिचा पोन्नयिन सेल्वन (2023)मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.