“आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिने 4-5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता”; जिया खानच्या आत्महत्येबद्दल सूरज पंचोलीच्या आईचं वक्तव्य

| Updated on: Nov 28, 2024 | 3:25 PM

जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणात सूरज पांचोलीला 10 वर्षांनी निर्दोष मुक्त करण्यात आले. त्याच्या आई जरीना वाहाब यांनी एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. त्यांनी जिया आणि सूरजच्या नातेसंबंधाबाबत तसेच जियाच्या पूर्वीच्या आत्महत्येच्या प्रयत्नांबद्दलही माहिती दिली आहे.

आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिने 4-5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता; जिया खानच्या आत्महत्येबद्दल सूरज पंचोलीच्या आईचं वक्तव्य
Follow us on

अभिनेता आदित्य पांचोलीची पत्नी जरीना बहवने कंगना राणौत आणि आदित्यसोबतच्या अफेरबद्दल खुलासा केल्यानंतर तिने जिया आणि लेक सुरज पांचोलीच्या नात्याबद्दलचाही खुलासा केला आहे. तसेच जिया खानच्या आत्महत्येवरूनही जरीनाने मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री जिया खानने 3 जून 2013 रोजी मुंबईमधील जुहू परिसरातील घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. जियाचा मृत्यू झाला, त्यावेळी ती 25 वर्षांची होती. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसोबतच्या नात्याबाबत लिहिलेले पत्रही पोलिसांना सापडले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी सूरजला अटकही केली होती. तसेच त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच आरोपांतर्गत सूरजवर 10 वर्षे खटला चालवण्यात आला. अखेर त्याची एप्रिल 2023 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. जियाच्या आत्महत्या प्रकरणावर सूरजची आई अभिनेत्री जरीना वहाबने एका मुलाखतीत भाष्य केलंय. सूरजने 2015 साली ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात अथिया शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत होती. या व्यतिरिक्त सूरजने ‘

जरीनाने सांगितलं की, जिया खानने सूरज पंचोलीला भेटण्यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा केला तसेच तिने त्याआधीही 4-5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नशीब असं होतं की ती माझ्या मुलाबरोबर असताना हे सगळं घडलं,” असं जरीनाने एका दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली,” १० वर्षे हे सगळं सहन करावं लागलं. विनाकारण हे सगळं सहन करावं लागलं. आम्ही सर्वजण खूप वाईट काळातून गेलो, पण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे तो म्हणजे जर तुम्ही खोटं बोलून कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करत असाल तर तुम्हाला त्याची व्याजासह परतफेड करावीच लागते.’ सूरज दोषी नव्हता, आम्ही सगळं सहन केलं, 10 वर्षे लागली पण तो त्यातून निर्दोष बाहेर पडला आणि मी आनंदी आहे. या घटनेचा सूरजच्या करिअरवरही परिणाम झाला,” असं जरीनाने म्हणत या प्रकरणाचा कुटुंबावर कसा परिणाम झाला, त्याबाबत तिने सांगितलं.

आजही जिया खानच्या जाण्याला कुठे तरी सूरजच दोषी असू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान सूरजने ‘बी हॅप्पी’, ‘हवा सिंग’, ‘टाइम टू डान्स’, ‘सॅटेलाइट शंकर’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.