RRR Public Review | अद्भूत, जबरदस्त, थरारक… प्रेक्षकांकडून शिट्ट्यांची सलामी, ‘RRR’ पाहून पब्लिक क्या बोलती?

| Updated on: Mar 25, 2022 | 11:46 AM

बहूचर्चित ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच 'RRR' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR (Rise Roar Revolt) 25 मार्च 2022 (25 March 2022) रोजी रिलीज झाला आहे.

RRR Public Review | अद्भूत, जबरदस्त, थरारक... प्रेक्षकांकडून शिट्ट्यांची सलामी, RRR पाहून पब्लिक क्या बोलती?
RRR public review
Follow us on

मुंबई : बहूचर्चित ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR (Rise Roar Revolt) 25 मार्च 2022 (25 March 2022) रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपट रिलीझ होण्याच्या आधीपासूनच या चित्रपाटाची कथा , स्टारकास्ट या बाबात चर्चा होती. एवढंच काय तर चित्रपटाच्या मार्केटींगच्या सुद्धा अनेक चर्चा करण्यात आल्या होत्या. सध्या या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन समोर आले आहे त्या रिव्ह्यूनुसार, ‘RRR’ चित्रपटाने तेलुगू प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाला पहिल्या सीन पासून प्रेक्षकांकडून शिट्ट्यांची सलामी मिळाली. सुमारे आठ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने समिक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण (Ram charan)आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) याच्या प्रमुख भुमिकेत भारताचा प्रेरणादायी सुवर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला

साऊथपासून बॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी कलाकृत केलेला हा चित्रपट लोकांनांही आवडलेला आहे. सोशल मीडियाच्या मध्यमातून सर्व जण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राजामौलीचा हा चित्रपटाला लोकांच्या पसंतीस उतरला आहे. काही लोकांच्या मते हा चित्रपट बाहुबलीपेक्षा चांगला असल्याचे सांगितले आहे.

एका युजर्सनी या चित्रपटाचे वर्णन टॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून केले आहे. लोक RRR ला मनाला भिडणारा चित्रपट म्हणत आहेत. एका यूजर्सने याला 5 स्टार दिले आहेत. राजामौली (एसएस राजामौली) यांचे दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटाच्या मध्यंतरात लोकांनी याला पहिल्या दृश्यापासून शेवटच्या दृश्यापर्यंत हा चित्रपट जबरदस्त असल्याचं म्हटलं जातं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनपासून लोक शिट्ट्या वाजवताना दिसत आहेत.

काहीच्या मते भारतीय बॉक्स ऑफिस एक नवीन रेकॉडसाठी तयार आहे असे काहींचे म्हणणे आहे. या चित्रपटातील एनटीआर आणि राम चरण यांची केमिस्ट्री, परफॉर्मन्स आणि स्क्रीन प्रेझेन्स या सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

पाहा काय आहे IMDb Rating
या बहूचर्चित चित्रपटाला IMDb ने 10 पैकी 9.2 स्टार्स देत आधीच सुपर हिट घोषीत केल्याचे दिसत आहे. हा चित्रपट नवीन रेकॉर्ड करणार यात काही वादच नाही.

RRR IMDb

चित्रपटाचे कथानक :

हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली, तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

कोण होते? ‘अल्लुरी सीताराम राजू’

अल्लुरी सीताराम राजू यांनी देशासाठी जे केले ते कोणीही विसरू शकत नाही. अल्लुरी यांचा जन्म 1857 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी संसारिक जीवनातून संन्यास घेतला. यादरम्यान त्यांनी देशातील अनेक शहरे, मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश असा प्रवास केला. अल्लुरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. 1920 च्या सुमारास अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराचा साक्षीदार झाला होता. अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेचे विचार सोडून त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले आणि आपले धनुष्य-बाण घेऊन इंग्रजांचा नायनाट करण्यासाठी निघाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना अल्लुरी सीताराम राजू यांनीही इंग्रजांकडून अनेक छळ सोसले होते.

कोण होते? ‘कोमाराम भीम’

कोमाराम भीम यांचा जन्म 1901 मध्ये संकेपल्ली, हैदराबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनात एकच उद्देश होता, तो म्हणजे गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणे. भीम फक्त 19 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. वडिलांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या भीमाला ‘निजामाच्या राजवटीला धडा शिकवायचा होता, पण निजामाच्या राजवटीशी एकटा लढण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. तरुणपणात भीम यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा खूप प्रभाव होता. त्याच्याप्रमाणेच त्याला देशासाठी काहीतरी करायचे होते.

संबंधित बातम्या

Urfi javed : हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका, सगळी ‘हिरवाई’एकाच फोटोत

Esra Bilgic: ‘लाज वाटली पाहिजे तुला’ म्हणत पाकिस्तानी युजर्सनी अभिनेत्रीला ‘ब्रा’च्या जाहिरातीवरून केलं ट्रोल

‘अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया’; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर