मुंबई : अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) ट्विटरवर अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने तिची मुलगी जान्हवीचा फोटो शेअर केला असून लेकीने जगातील सर्वात प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याचे जुहीने नमूद केले आहे. जुहीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच तिच्या अभिनंदनासाठी लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. इतकेच नाही तर जुहीचा सहकलाकार आणि मित्र शाहरुख खाननेही जुही आणि तिची मुलगी जान्हवीचे अभिनंदन केले. मुलगी ग्रॅज्युएट झाल्यावर जुहीला खूप आनंद झाला आहे. सध्या ती
मुलीच्या घरी येण्याची ती आतुरतेने वाट पाहत आहे.
जुही चावला म्हणाली की, जेव्हा तिची मुलगी जान्हवी मेहता घरी येईल तेव्हा ती हा आनंद साजरा करेल. अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये प्रवेश करत असून मोठी स्टार बनण्याची स्पर्धा करत असताना जान्हवी मात्र लाइमलाइटपासून दूर आहे. जुही म्हणते की तिची मुलगी जान्हवी जाणीवपूर्वक लाइमलाइटपासून दूर राहते. तिचा शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.
#columbiaclass2023 pic.twitter.com/C7fFn8Uwk2
— Juhi Chawla Mehta (@iam_juhi) May 18, 2023
क्रिकेटमध्ये आहे जान्हवीला रस
जुहीने सांगितलं की जान्हवीला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. ती म्हणाली की, जान्हवी जेव्हाही क्रिकेटबद्दल बोलते तेव्हा ती खेळाडू आणि खेळातील बारकावे समजावून सांगते. कधी कधी तिला असा प्रश्न पडतो की वाटतं की जान्हवीला क्रिकेटची इतकी माहिती कुठून मिळाली? जान्हवीच्या या माहितीने तीदेखील हैराण झाली आहे.
इतर स्टार किड्सपेक्षा माझी लेक वेगळी
मात्र, जान्हवीला क्रिकेटमध्ये जो रस आहे, ते सर्व अनुवांशिकरित्या आल्याचे जुहीला वाटते. ती म्हणाली की, तिची मुलगी त्या स्टार किड्सपेक्षा वेगळी आहे जे कलाकार म्हणून पडद्यावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. यशस्वी होण्यासाठी त्यांच्यावर खूप दबाव असल्याचे जुहीला वाटते. आणि मग ती (स्टार किड्स) सोशल मीडियावर ट्रोल होतात आणि लोकांच्या कमेंट्सचाही सामना करावा लागतो. पण जान्हवीच्या बाबतीत असं नाही, असं जुहीने नमूद केलं.