बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये त्यांचे नशीब आजमवत आहेतच,पण आता अजून काही सेलेबकिड्सची एन्ट्री चित्रपट आणि सीरिजच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
‘महाराजा’ नंतर आमिरचा लेक नव्या चित्रपटात
ज्यातील काही नाव ही आधीच चर्चेत आलेली आहे. जसं की ओटीटीवर ‘महाराजा’ चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा आमिर खानचा मुलगा जुनैद खान. महाराजा या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. आता जुनैद अजून एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे पण तेही एका नव्या स्टारकिड्स सोबत.
जुनैद आणि श्रीदेवीची धाकटी लेक खुशी एकत्र दिसणार
जुनैद लवकरच श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या दोघांचाही एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘लवयापा’. चित्रपटाची कथा आताच्या ‘Gen Z’ च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एक नवीन रसायन असणार आहे.
‘लवयापा’ चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर रिलीजपूर्वी रिलीज झालेल्या गाण्याने काही चाहत्यांची निराशा झाली असली तरी आता ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली असून चित्रपटाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आहे. दरम्यान ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. जुनैद खानने गौरव आणि खुशी कपूरने बानी ही भूमिका साकारली आहे. जे स्वतःला एक परफेक्ट कपल मानतात, त्यांच्या पालकांसमोर लग्नाबद्दल बोलतात.
बानीच्या वडिलांची भूमिका करणारा आशुतोष राणा हे एक गेम खेळतात तेव्हा हे सगळं प्रकरण उलगडतं.अशी एकंदरित ही स्टोरी आणि त्याभोवती फिरणारं सगळे कॅरेक्टर पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपट पाहायाला नक्कीच रंजक असेल असं आतातरी ट्रेलर पाहून आपण म्हणून शकतो.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
‘लवयापा’ हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’ चा रिमेक आहे. या चित्रपटात किकू शारदाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन वीकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. महाराजा नंतर जुनैद खानला रोमँटिक कॉमेडी भूमिकेत पाहणं निश्चितच नवा अनुभव ठरणार आहे.