आपल्या गाण्यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या जस्टिन बीबरची(Justin Bieber) भारतीय आगामी म्यूजिक कॉन्सर्ट (Music concert)अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे येत्या 18 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली (Delhi) जस्टिन बीबरची आगामी भारतीय म्यूजिक कॉन्सर्ट होणार होती. मात्र ती रद्द झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मेगा कॉन्सर्टच्या आयोजकांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. जस्टिन बीबरने म्यूजिक कॉन्सर्ट पुढे ढकलत असतानाच सुरुवातीलाच याबाबत हिंट दिल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. रामसे हंट सिंड्रोममधून (Ramsay Hunt syndrome)बरे झाल्यानंतर त्याला थकवा जाणवत असल्याचे कारण देत जस्टिनने दिले आहे.
गेल्या आठवड्यात, जस्टिनने सोशल मीडियावर जाहीर केले की तो परफॉर्मन्समधून दीर्घ ब्रेक घेत आहे. त्यामुळे जस्टिस परदेशी टूरवरील त्याचे आगामी म्यूजिक कॉन्सर्ट रद्द करत आहे. यामुळे त्याच्या दिल्लीतील प्रस्तावित मैफिलीवर शंका निर्माण झाली, त्या वेळी BookMyShow, जो भारतात या म्यूजिक कॉन्सर्ट प्रचार करत होता. ही मैफल ‘कॅरी फॉरवर्ड’ होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर नुकतेच कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे. BookMyShow च्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “जस्टिन बीबर जस्टिस वर्ल्ड टूर, 18 ऑक्टोबर 2022 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार होती, हे जाहीर करताना आम्हाला अत्यंत दुख होत आहे. गायक जस्टिन बीबरची तब्येतीच्या चिंतेमुळे कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे. आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे, की त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे ते दुर्दैवाने पुढच्या महिन्यात येऊ शकणार नाहीत.
तिकिटांचे पैसे ज्यांनी खरेदी केले आहेत त्यांना परत केले जातील असे कंपनीने म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी, तिकीट विंडो उघडल्यानंतर काही मिनिटांत शोची तिकिटे विकली गेली होती. निवेदनानुसार, BookMyShow ने यापूर्वीच शोसाठी तिकीट खरेदी केलेल्या सर्व ग्राहकांसाठी तिकिटाच्या किमतीचा संपूर्ण परतावा देण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण परतावा ग्राहकाच्या खात्यात 10 वर्किंग देजमध्ये दिसून येईल. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
आम्ही तुम्हाला सांगतो की जस्टिन बीबरला या वर्षाच्या सुरुवातीला रामसे हंट सिंड्रोमचे निदान झाले होते, ज्यामुळे त्यांचा चेहरा एका बाजूने अर्धांगवायू झाला होता. यानंतर त्याने स्टेजवर सादरीकरणातून ब्रेक घेतला पण नंतर यशस्वी पुनरागमन केले. गेल्या आठवड्यात त्याच्या दुसऱ्या ब्रेकची घोषणा करण्यापूर्वी जस्टिनने परत आल्यापासून युरोप आणि दक्षिण अमेरिकेत सहा लाइव्ह शो देखील केले. गेल्या मंगळवारी, जस्टिन बीबरने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले, की तो टूरमधून ब्रेक घेत आहे कारण स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर त्याला थकवा जाणवत होता. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, स्टेजवरून उतरल्यानंतर थकव्या जाणवत आहे . मला आता माझ्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी तूर्तास या दौऱ्यातून विश्रांती घेणार आहे. मी ठीक आहे, पण मला विश्रांती आणि बरे होण्यासाठी वेळ हवा आहे.