सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्राटसोबतच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र सगळ्यात जास्त चर्चा आहे ती त्यांच्या वयातील अंतराची. पण जेव्हा आमिरने त्याच्या आणि गोरीच्या नात्याचा उलगडा केला तेव्हा तो हे देखील म्हणाला होता की,60 व्या वर्षी लग्न करणे शोभणार नाही. पण असा एक अभिनेता आहे त्या त्याच्या 70 व्या वर्षी लग्न केलं आहे. तेही आपल्या मुलीच्या वयाच्या एका अभिनेत्रीसोबत.
70 व्या वर्षी हा अभिनेता पुन्हा बोहल्यावर चढला
हा अभिनेता चक्क चौथ्यांदा बोहल्यावर चढला आहे. हा दिग्गज अभिनेता आहे कबीर बेदी. ज्यांनी एक किंवा दोन नाही तर चार वेळा लग्न केलं आहे. कबीर बेदी यांचे पहिले लग्न 1969 मध्ये नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्याशी झालं होतं. दोघांनाही पूजा बेदी आणि सिद्धार्थ अशी दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रीजशी दुसरं लग्न केलं. हे लग्नही टिकू शकलं नाही, त्यानंतर त्यांनी रेडिओ प्रेझेंटर निक्कीशी तिसरं लग्न केलं. पण हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
चौथ्यांदा प्रेमात अन् 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी लग्न
कबीर बेदी हे 70 वर्षी पुन्हा प्रेमात पडले आणि त्यांनी चौथ्यांदा लग्न केलं. कबीर बेदी यांनी ब्रिटिश वंशाची अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्मात्या परवीन दुसांजशी चौथं लग्न केलं. परवीन ही कबीर यांच्यापेक्षा तब्बल 29 वर्षांनी लहान आहे. कबीर बेदी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कबीर बेदी चार वेळा प्रेमात पडले आणि त्यांनी चार वेळा लग्न केलं. कबीर बेदी आणि परवीन हेदोघेही एकमेकांना जवळपास 3-4 वर्षे डेट करत होते असं म्हटलं जातं.
बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय स्टार
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. कबीर बेदींनी इतक्या परदेशी चित्रपटांमध्ये काम केले आहे की, आजपर्यंत कोणताही बॉलिवूड अभिनेता त्यांचा विक्रम मोडू शकलेला नाहीये. कबीर यांनी 1960 मध्ये करिअरला सुरुवात केली. 70 च्या दशकात ते आंतरराष्ट्रीय स्टार बनले होते. त्यांनी सर्वाधिक परदेशी चित्रपट करून एक विक्रम केला आहे. जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.