Kajol | लग्नाच्या दिवशी थकून काजोलची अशी झाली होती हालत, अजय देवगणकडे केली थेट ‘ही’ मागणी

| Updated on: Aug 01, 2023 | 11:21 AM

Kajol Remembers Her Wedding Day : अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगणच्या लग्नाला 24 वर्ष झाली आहेत. हे दोघेही बॉलिवूडमधील पॉवर कपल मानले जातात.

Kajol | लग्नाच्या दिवशी थकून काजोलची अशी झाली होती हालत, अजय देवगणकडे केली थेट ही मागणी
Follow us on

Ajay Devgn & Kajol : अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिवेता अजय देवगण (Ajay Devgan) हे दोघेही बॉलिवूडमधील पॉवर कपल मानले जातात. दोघांच्या लग्नाला तब्बल 24 वर्ष उलटली आहेत. २४ फेब्रुवारी १९९९ साली त्या दोघांनी लग्न केल. त्यांना निसा आणि युग अशी दोन मुलंही आहेत. काजोल सोशल मीडियावरही बरीच ॲक्टिव्ह असते. ती बऱ्याचवेळेस तिचं कुटुंब आणि मुलांबद्दल बोलत असते. यावेळी काजोलने तिच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.

ऐन लग्नात अजयकडे केली होती ही मागणी

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत काजोलने तिचं लग्न कसं झालं, याचा अनुभव सांगितला आहे. वधू म्हणून मी अतिशय रिलॅक्स होते, असं काजोलने नमूद केलं. मला माझ्या लग्नाचा काही स्ट्रेस, काही टेन्शन नव्हतं. पण मी लग्नात बरीच रेस्टलेस झाले होते. लग्नाचे विधी बराच वेळ सुरू होते, शेवटी मी अजयला कोपराने ढोसलं आणि म्हणाले की, भटजींना थोडं लवकर आवरायला सांग ना यार… अशा शब्दांत काजोलनने लग्नाचा किस्सा सांगितला.

‘ आमचं लग्न एक खासगी समारंभ होता, फक्त ५० लोकं आली होती. जेव्हा आमचं लग्न लागत होतं, तेव्हा मी अजयला म्हटलं की पंडितजींना थोडं लवकर करायला सांग ना. ते बराच वेळ लावत होते. आमचं लग्न विधिवत झालं होतं. महाराष्ट्रीय पद्धतीने आम्ही लग्न केलं आणि सप्तपदीही घेतल्या. त्यावेळी तिथे बसून बसून मी थकले होते. कधी एकदा इथून उठता येईल, असं मला झालं होतं,’ अशी आठवण काजोलने सांगितली.

 

लग्नाचा काहीच स्ट्रेस नव्हता

पुढे काजोल असंही म्हणाली की मला माझ्या लग्नाचं काही टेन्शन घ्याव लागलं नाही, मला बिलकूल स्ट्रेस नव्हतात. माझे कुटुंबिय आणि माझ्या बहीणी सगळी तयारी करत होत्या. त्यांनी सर्व जबाबदारी घेतली होती, माझं संपूर्ण कुटुंब स्ट्रेसमध्ये होतं, त्यांना सगळंच ऑर्गनाईज करायचं होतं. मी तर फक्त जाऊन मेकअप करायला बसले होते, असंही काजोलने सांगितलं.

काजोल नुकतीच लस्ट स्टोरीज २ आणि द ट्रायल या थ्रिलर ड्रामामध्ये झळकली. तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले.