बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव आहे. नुकतंच ट्विटरनं तिच्या अकाऊंवर बंदी घातली होती. त्यामुळे आता ती इंस्टाग्रामवर अॅक्टिव असते. नुकतंच तिनं अभिनेत्री समंथाचं कौतुक केलं आहे. साउथ सिनेमाची दमदार अभिनेत्री समंताची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' ('The Family Man 2') चा ट्रेलर रिलीज झालाय. तो पाहिल्यानंतर कंगना खूप प्रभावित झाली आणि तिनं सोशल मीडियावर समंथाचे कौतुक केलंय.
कंगना रनौत यांनी समंथाचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावर लिहिलं की "या मुलीजवळ माझं हृदय आहे". या पोस्टसोबत तिनं आपल्या इंस्टा स्टोरीजमध्ये ट्रेलरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
कंगनाच्या या पोस्टला पाहून असं दिसतं की ती आता दक्षिण सिनेमाकडे आकर्षित झाली आहे. कारण बॉलिवूडमध्ये तिनं प्रत्येकाला आपला शत्रू बनवलं आहे. करण जोहरपासून शाहरुखपर्यंत तिचे वाद आहेत. कंगनाचे हे फोटो आज सकाळचे आहेत. आज तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.
आता असं वाटतंय की कंगना दक्षिण इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करतेय. ज्यासाठी ती आता या स्टार्सचं जोरदार कौतुक करतेय.
आज अभिनेत्री विमानतळावर एक सुंदर साडी परिधान करुन दिसली.