मुंबई | 13 जानेवारी 2024 : कंगना रनौत आणि वाद.. हे जुनं समीकरण आहे. मूव्ही असो किंवा बेधडक वक्तव्य.. कंगना नेहमीच चर्चेत असते. तशीच यावेळीही कंगना पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळेला त्याच कारण जरा वेगळं आहे. सध्या ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. कंगना लग्न कधी करणार ? तिचा बॉयफ्रेंड कोण ? असे अनेक सवाल उपस्थित होत असतात. पण आता कंगना पुन्हा चर्चेत आली आहे, कारण कंगना रनौत अलीकडेच एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली. कंगना आणि तो तरूण हे दोघे हातात हात घालून सलूनबाहेर पडताना फोटो व्हायरल झाला आहे. त्या दोघांनीही पापाराझींसमोर पोझ दिली आणि ते पुढे निघाले.
मात्र तेव्हापासूनच विविध चर्चांना सुरूवात झाली आहे. कंगनासोबत दिसलेला तो तरूण आहे तरी कोण , ती त्याच्याशी लग्न करणार आहे का असे एक ना अनेक हजारो प्रश्न त्या एका फोटोमुळे उपस्थित झाले आहेत, नेटकऱ्यांनाही असे प्रश्न पडले असून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ‘तो कोण आहे?’ असा सवाल अनेकांनी विचारला. काही नेटकऱ्यांनी तर तो माणूस अभिवेता हृतिक रोशन सारखाच दिसला . कंगनाला शेवटी हृतिकसारखा दिसणारा कोणीतरी सापडला अशी कमेंटही कांहीनी केली. मात्र, बऱ्याच चाहत्यांनी त्यांचे कौतुक करत कंगानासाठी आनंद असल्याचे नमूद केले. दोघांची जोडी छान असल्याचेही नेटकऱ्यांनी म्हणत तिचे अभिनंदन केले.
लग्नाबद्दल काय म्हणाली कंगना ?
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये एका मुलाखतीत कंगना लग्नाबद्दल बोलली होती. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि जर ती वेळ तिच्या आयुष्यात यायची असेल तर ती येईल, असे अभिनेत्री म्हणाली होती. कंगनाने असेही सांगितले होते की, तिला लग्न करून फॅमिली स्टार्ट करायची आहे, पण ती योग्य वेळ आल्यावरच मी हे करेन असं कंगना म्हणाली होती.
कंगनाच्या कामाबद्दगल बोलायचं झालं तर कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या नवीन चित्रपटात व्यस्त आहे. ती या चित्रपटात केवळ अभिनयच करत नाहीये तर तिने चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज होणार होता, पण आता तो (2024) याच वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.