मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरील (Kangana Ranaut Tweet) ट्वीटनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. तसेच, अनेकांनी तिला विरोध केला आहे. यासर्व विरोधानंतर कंगनाला आता उपरती झाल्याचं चित्र आहे. “मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी आहे”, असं ट्वीट तिने केलं (Kangana Ranaut Tweet).
कंगनाच्या ट्वीटनंतर शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक नेत्यांनी कंगनावर टीकेची झोड उठवली. तर अनेक कलाकारांनीही कंगनाविरोधात त्यांचा निषेध नोंदवला आहे. इतकंच नाही तर मुंबईकरांनीही तिला विरोध केला आहे.
त्यानंतर आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं. “महाराष्ट्रासह माझ्या सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे आणि मला माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबाबत माझं प्रेम सिद्ध करायची गरज नाही, जिने मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, जय मुंबई जय महाराष्ट्र”, असं ट्वीट कंगनाने केलं. त्यासोबतच तिने एक फोटोही ट्वीट केला. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर #IndiaWithKanganaRanaut ट्रेंड करत होतं (Kangana Ranaut Tweet).
No words to express my gratitude for my friends from everywhere including Maharashtra, they know my intentions and I don’t need to prove my love for my Karmbhoomi Mumbai who I always referred to as Maa Yashodha who adopted me,Jai Mumbai Jai Maharashtra ?#indiawithkanganaranaut pic.twitter.com/Xp4DUahbUu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.
लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे – अमृता फडणवीस
भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी कंगनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. कंगनाने अमृतांच्या ट्वीटला रिट्विट केले. “आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही. लोकशाहीत व्यक्त होण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत राहावेत. मात्र, पोस्टरला चपलांनी मारणं हे चुकीचं आहे”, असं
We may not agree with what someone has to say,but we must defend the right to express in democracy!Freedom of speech,freedom of belief,freedom of movement,freedom of press-cannot b suppressed! We can have counter arguments but beating posters of critics with chappals is a new low
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 4, 2020
Kangana Ranaut Tweet
संबंधित बातम्या :
मी मराठा, महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचं ते करा, कंगनाचा इशारा