मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कंगना प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर उघडपणे आपली मतं मांडत असते. अलीकडेच कंगनाने चाहत्यांना माहिती दिली होती की, तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आता अभिनेत्रीने चाहत्यांनी एक चांगली बातमी दिली आहे. होय, कंगना रनौत कोरोना मुक्त झाली आहे (Kangana Ranaut wins the battle against corona virus).
आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती खुद्द कंगनाने दिली आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहून चाहत्यांना यांची माहिती दिली आहे. कंगनाला कोरोनाची लागण झाल्यापासून, तिचे चाहते तिच्या रिकव्हरीसाठी सतत प्रार्थना करत होते.
कंगनाने इन्स्टाग्रामवर आपल्या स्टोरीद्वारे लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी या विषाणूचा कसा पराभव केला हे मला तुम्हाला या बद्दल काही सांगायचे आहे, की मी या विषाणूला कसे हरवले. मला या विषाणूबद्दल बोलू नये, असे सांगितले गेले आहे. होय, हे खरं आहे की कोरोनाबद्दल काही सांगितले तर, बरेच लोक रागावतात. सर्व चाहते आणि हितचिंतकांचे आभार आणि खूप प्रेम.’
कंगनाने पुन्हा एकदा अशा प्रकारे आपल्या विरोधकांना लक्ष्य केले आहे. कंगनाही ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. कोरोना विषाणू विरुद्धची ही लढाई यशस्वी रित्या जिंकल्याबद्दल चाहते तिचे अभिनंदन करत आहेत (Kangana Ranaut wins the battle against corona virus).
अलीकडेच कंगनाने आपल्या इंस्टावर एक स्टोरी पोस्ट केली होती, त्यात लिहिले होते की, इन्स्टाग्रामने माझी कोरोना पोस्ट देखील हटवली आहे. या पोस्टमध्ये मी धमकी दिली होती की, मी कोरोना संपवेन. मी ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांकडून सहानुभूती ऐकली होती, पण आता थेट कोव्हिड फॅन क्लब. मी दोन दिवसांपासून इन्स्टाग्रामवर आहे, असे दिसते की मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ यावर टिकू शकणार नाही.’
अलीकडेच कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. बंगाल हिंसाचारावरील अभिनेत्रीच्या ट्विटनंतर कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. त्यानंतर अभिनेत्रीने इंस्टाकडे आपला मोर्चा वळवला. कंगना लवकरच ‘थलायवी’मध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे तिच्या या चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
(Kangana Ranaut wins the battle against corona virus)
‘राधे’मध्ये दिशा पाटणीला पाहून खुश झाली टायगर श्रॉफची आई, फोटोवर कमेंट करत म्हणाली…
Women Led Series: ‘तिची’ कहाणी, दमदार अभिनय, या 5 वूमन सेंट्रिक वेब सीरीज पाहाच!
Religion Change : प्यार दिवाना होता हैं…, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी केलं धर्म परिवर्तनhttps://t.co/kU2ehnDTta#Religion #bollywoodactress
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2021