तर मग तुम्हीच दहशतवादी… , ‘The Kerala Story’ ला विरोध करणाऱ्यांना कंगनाने सुनावलं

| Updated on: May 06, 2023 | 11:55 AM

Kangana Ranaut On The Kerala Story : अभिनेत्री कंगना रनौतने 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे समर्थन केले असून चित्रपट प्रदर्शित झाल्याने ज्यांना त्रास होतोय, त्यांना तिने चांगलेच सुनावले आहे. रिलीजमध्ये ज्यांना अडचण आहे ते स्वतः दहशतवादी असल्याचे म्हटले आहे.

तर मग तुम्हीच दहशतवादी... , ‘The Kerala Story’ ला विरोध करणाऱ्यांना कंगनाने सुनावलं
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिचे मुद्दे परखडपणे मांडत असते. तिने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे (The Kerala Story) समर्थन केले आहे. कंगनाने चित्रपटाविरोधात बोलणाऱ्यांवर टीका केली आहे. सुदीप्तो सेनच्या चित्रपटाचे समर्थन करत कंगनाने म्हटले आहे की, उच्च न्यायालय, गृह मंत्रालय आणि संपूर्ण जग ISIS ला दहशतवादी म्हणत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चित्रपटाबाबत अडचण येत असेल तर तुम्ही स्वतःच दहशतवादी आहात.

एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या कंगना रणौतने केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत सांगितले की, हा चित्रपट कोणत्याही धार्मिक समुदायाला लक्ष्य करत नसून एका दहशतवादी संघटनेला लक्ष्य करत आहे. कंगना म्हणाली, ‘मी हा चित्रपट पाहिला नाही, पण चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. जेव्हा उच्च न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असे सांगितले. मला वाटतं की हा चित्रपट इतर कोणालाही नव्हे तर फक्त ISIS चुकीची असल्याचे सांगत आहे, नाही का? उच्च न्यायालय असे म्हणत असेल तर ते योग्य आहे. ISIS ही दहशतवादी संघटना आहे. हे फक्त मी नव्हे तर संपूर्ण जग हेच सांगत आहे.

 

‘द केरळ स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांवर ताशेरे ओढत कंगना म्हणाली- ‘जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही, तर तुम्ही चित्रपटापेक्षाही एक मोठी समस्या आहात. तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात, याचा आधी विचार करायला हवा, असे परखड मत तिने मांडले.

मात्र, यानंतर कंगनानेही मी असे काही (वेगळं) बोलले नाही, हे तर साधं गणित असल्याचे सांगितले. कंगना रानौत कोणत्याही मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यापासून मागे हटत नाही. The Kerala Story चित्रपटा बद्दल बराच गदारोळ सुरू आहे. हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कंगनाच्या पुढच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनातही पाऊल टाकणार आहे.