Karan Johar Kangana Ranaut Fight : दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद जगप्रसिद्ध आहे. कंगना ही करणवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ती बर्याच दिवसांपासून करण जोहर याच्यावर, त्याच्या चित्रपटातून (तो) घराणेशाहीला प्रोत्साहन (Nepotism) देत असल्याचा आरोप करत आहे.
एवढेच नाही तर करणनेही कंगनासोबत काम करण्याची इच्छा नाही, असेही सांगितले होते. मात्र करणने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर करण आणि कंगनामध्ये पॅचअप झाले की काय अशीही चर्चा सुरू आहे.
कंगना राणौत हिचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून आपण तो पाहण्यास खूप उत्सूक आहोत, असे वक्तव्य करणने एका मुलाखती दरम्यान केले. तुला कोणत्याही राजकीय घडामोडींवर चित्रपट बनवायचा आहे का ? असे करणला विचारण्यात आले असता त्याने कंगनाच्या पॉलिटिकल ड्रामा फिल्म असलेल्या इमर्जन्सीचा उल्लेख केला.
कंगनाचा चित्रपट पाहण्यास उत्सुक
या प्रश्नाचे उत्तर देताना करण म्हणाला की, इमर्जन्सी हा चित्रपट बनतोय ना, मी तो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलेल्या कंगनाने करणवर टीका करत त्याला मूव्ही माफिया म्हटले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाक् युद्ध सुरू असून दोघेही एकमेकांवर टीका करत असतात.
रॉकी और रानी की प्रेम कहानी बद्दल काय म्हणाली होती कंगना ?
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा करणने दिग्दर्शित केलेला चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यावरही कंगनाने टीका केली होती. ‘ हा काय मूर्खपणा आहे ? स्वत:च्याच कामाची कॉपी केल्याबद्दल करण जोहरला लाज वाटली पाहिजे. यावर कोणी 250 कोटी कसे खर्च करू शकतात ? ‘ असा प्रश्न विचारत तिने करण जोरवर टीकास्त्र सोडले होते.
कामाबद्दल बोलायचं झालं तर रॉकी और रानी की प्रेम कहानी द्वारे करणने दिग्दर्शनात पुनरागमन केले असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावत आहे. तर कंगनाचे तेजस आणि इमर्जन्सी हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.