मुंबई : स्टारकिड आणि करण जोहरचं नात तसं नेहमी चर्चेत असतं. नेहमीप्रमाणे करण जोहर (Karan Johar) आणखी एक स्टारकिडला लाँच करणार आहे. करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन्स लवकरच अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरला (Shanaya Kapoor) हिला लाँच करणार आहे. शनायाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही बातमी दिली आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांना शनायाच्या सौंदर्याचे कौतुक देखील केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त करण जोहरला टार्गेट करण्यात आले. परत एकदा लोकांनी करणवर नेपोटिझमचा आरोप केला आहे. (Karan Johar Will launch Shanaya Kapoor in Bollywood soon)
परंतु, करणवर नेपोटिझमचा आरोप करण्याची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदरही करणला अनेकदा नेपोटिझमवरून ट्रोल केले गेले आहे. सर्वप्रथम करणवर नेपोटिझमचा आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला होता. आता शनाया कपूरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा करणवर टिका केली जात आहे. यावेळी, तर करणला ‘गॉड ऑफ नेपोटिझम’ असेही म्हटले गेले.
शनाया कपूरच्या अगोदर करणने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे अशा बॉलिवूड स्टारकिड्सना लाँच केले आहे. आता एक अशीही चर्चा सुरू आहे की, करण लवकरच जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांनाही तो बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे (Karan Johar Will launch Shanaya Kapoor in Bollywood soon).
गौतम अदानी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी चर्चा देखील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्यावर गेले आहे.
याशिवाय ‘जुग जुग जियो’, ‘शेरशाह’, ‘रणभूमि’, ‘दोस्ताना 2’ ते ‘सूर्यवंशी’ या मोठ्या बजेटचे चित्रपट यंदा प्रदर्शित होऊ शकतात. भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी गौतम अदानी एक आहेत. त्यांनी यूपीमध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी हा करार झाला आणि अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकतात.
(Karan Johar Will launch Shanaya Kapoor in Bollywood soon)
67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार!