कुठे मूर्ती आणि कुठे करीना ? प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अभिनेत्रीवर टीकास्त्र

| Updated on: May 06, 2023 | 11:10 AM

अभिनेत्री करीना कपूरच्या वर्तनाबद्दलचे दोन किस्से सांगत प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकानी तिच्यावर टीका केली आहे.

कुठे मूर्ती आणि कुठे करीना ? प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अभिनेत्रीवर टीकास्त्र
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही बॉलिवूडची आघाडीची, सौंदर्यवती अभिनेत्री आहे, पण तिच्या वागण्यामुळे ती अनेकदा टीकेची शिकार झाली आहे. तिला भेटणाऱ्या अनेक फॅन्सनी तिची वागणूक अतिशय उद्धटपणाची वाटते. आता आणखी एका चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाने करीनाच्या वागण्यावर टीका केली आहे. त्यांनी दोन घटनांचा उल्लेख केला आहे. मराठी चित्रपट निर्माते महेश टिळकर यांनी करिनाच्या उद्धट वर्तनावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत करीनाशी संबंधित दोन घटनांचा उल्लेख केला आहे. तिचे वर्तन चांगले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

महेश टिळेकरांची पोस्ट त्यांच्याच शब्दात…

कुठं मूर्ती आणि कुठे करीना?

नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते, की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईट मध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देत आहेत, म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते. तसेच काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते. पण ती तर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती.आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा सवालही त्यांनी केला.

दुसरी घटनाही अशीच

या पोस्टमध्ये टिळेकर यांनी पुढे त्यांच्या समोर घडलेला एक अनुभवही कथन केला आहे.

8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच.

पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून , चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो,सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं. जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे?

अमिताभ बच्चन,सलमान,शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का??? जेंव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहेत.

 

दरम्यान त्यांची ही पोस्ट अगदी योग्य असून अनेकवेळा सेलिब्रिटी फॅन्सना अशीच दुय्यम वागणूक देतात, असे  अनेकांनी या पोस्टच्या कमेंटमध्ये लिहिले आहे.