‘पापा’ सैफसह शेतात काम करतोय चिमुकला तैमूर, करीनाने शेअर केले खास फोटो!

| Updated on: Apr 23, 2021 | 1:50 PM

फोटोत सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमूर (Taimur) शेतात काम करताना दिसत आहेत. चिमुकल्या तैमूर अली खानच्या हातात खुर असून सैफ अली खानच्या हातात फावडे आहे. दोघेही शेतात काम करताना दिसत आहेत.

‘पापा’ सैफसह शेतात काम करतोय चिमुकला तैमूर, करीनाने शेअर केले खास फोटो!
करीना कपूर
Follow us on

मुंबई : दरवर्षी 22 एप्रिल रोजी जगभरात ‘अर्थ डे’ अर्थात ‘वसुंधरा दिवस’ साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने अभिनेत्री करीना कपूर खानने (kareena Kapoor-Khan) देखील या खास दिवसाचे औचीत्त्य साधत तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. करीनाने तिच्या सोशल मीडियावर दोन खास फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमूर (Taimur) शेतात काम करताना दिसत आहेत. चिमुकल्या तैमूर अली खानच्या हातात खुर असून सैफ अली खानच्या हातात फावडे आहे. दोघेही शेतात काम करताना दिसत आहेत. तर दुसर्‍या फोटोत तैमूर झाडावर बसलेला दिसत आहे (Kareena Kapoor Khan Share cute photo of Taimur and saif on earth day).

हे दोन फोटो शेअर करताना करीना कपूरने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे, अभिनेत्रीने लिहिले की, ‘अधिक रोपे लावा. जागतिक वसुंधरा दिनाच्या या विशेष प्रसंगी नवी झाडे लावा आणि ती झाडे जगवा.; यासह करीनाने हॅश टॅगमध्ये #WorldEarthDay  आणि #FavouriteBoys  देखील लिहिले आहे.

पहा करीना कपूरची ही खास पोस्ट

चिमुकल्या तैमूरला निसर्गाची आवड

सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, तैमूरचे निसर्गावर खूप प्रेम आहे. यामुळे त्याने आपल्या घरी एक छोटी बागही बनवली आहे. तैमूर तिथे खूप खेळतो. इतकेच नव्हे तर सैफ अली खानने सांगितले होते की तैमूरला चंद्र पाहून खूप आनंद होतो. ज्यामुळे त्याने आपल्या घरात एक नवीन दुर्बिणीही बसवली आहे. असो, जर आपण करीनाच्या पोस्टबद्दल बोललो तर, तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आला आहे. सगळेच तैमूरचे कौतुक करत आहेत.

अलीकडेच करीनाने तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म दिला आहे. ज्यानंतर ती आता पुन्हा एकदा कामावर परतली आहे. नुकतीच या अभिनेत्रीला मुंबईत एका जाहिरातीच्या शूटिंगवर स्पॉट केले गेले होते. करीना लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. ज्यासाठी तिने तयारी देखील सुरू केली आहे. या दिवसांत सैफ अली खान देखील घरी आहे. तो सतत आपल्या पत्नीची आणि दोन्ही मुलांची काळजी घेत असतो.

(Kareena Kapoor Khan Share cute photo of Taimur and saif on earth day)

हेही वाचा :

Amit Mistry | Bandish Bandits फेम अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन

Nadeem- Shravan Hits | नदीम-श्रवण यांची सुपरहिट गाणी, ज्यांनी वाढवली लाखो हृदयांची ‘धडकन’