बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्री पैकी एक असलेल्या करीना कपूरने अभिनयाचं नाणं वेळोवेळी खणखणीत वाजवलं आहे. अनेकविध भमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. एकीकडे ग्लॅमरस भूमिका साकारतानाच तिने नॉन-ग्लॅमरस रोलही सहजतेने केलेत. अभिनयाप्रमाणेच करीना ही तिच्या बिनधास्त वागण्यामुळे, वक्तव्यांमुळेही ओळखली जाते. सध्या करीना तिच्या ‘द बकिंघम मार्केट्स’ या आगामी चित्रपटाच्या रिलीजमुळे व्यस्त असून त्याची ती निर्मातीदेखील आहे. यामध्ये तिने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडलाय.
नेहमी स्पष्ट बोलणारी करीना ही चाहत्यांनाही खूपच आवडते.
करीना आता 44 वर्षांची झाली असली तरी तू अजूनही खूप फिट आहे. मूळची पंजाबी असल्याने तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज दिसतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ती बोटॉक्स, फिलर सर्जरी बद्दल बोलली. मला या सगळ्याची ( बोटॉक्सची) गरज नाही, असं तिने स्पष्टचं सांगितलं. करीना नक्की काय म्हणाली , चला वाचूया.
काय म्हणाली करीना ?
मी सुरूवातीपासूनच टॅलेंटवर काम मिळवलं, मेहनतही खूप केली. मी नेहमी स्वत:ची नीट काळजी घेतली, फिट राहिले. वय हा सौंदर्याचा भागच आहे. तुम्ही कायम तरूण दिसण्यासाठी प्रयत्न करु नयेत. त्यापेक्षा आहे ते वय एन्जॉय करा. मी ४४ वर्षांची आहे आणि मला याआधी इतकं छान कधीच वाटलं नसेल. मला बोटॉक्स किंवा कोणत्याही स्कॉटिश रिफॉर्मेशनची गरज वाटत नाही. माझ्या पतीला मी सेक्सी वाटते आणि माझे मित्र म्हणतात की मी कमाल दिसते. माझे चित्रपटही चांगले चालतात. मी जशी आहे तसं लोकांनी मला पहावं, आणि माझं कौतुक करावं, असं मला वाटतं.
सेल्फ केअर म्हणजे काय, तर स्वत:साठी वेळ काढणं , मित्रांसोबत चांगाल वेळ घालवणं, सैफसोबत निवांत वेळ घालवणं, स्वयंपाक करणं, जे आवडेलं ते करणं’, असं करीनाने सांगितलं. ‘ तुम्हाला काय करुन छान वाटेल हे महत्वाचं आहे. चांगलं अन्न, एखाद्यासोबत मनसोक्त गप्पा आणि वाईनची एक बॉटल हे माझ्यासाठी पुरेसं असतं’, असंही ती म्हणाली.
करीनाच्या या वक्तव्याचं सध्या खूप कौतुक होतंय. आपलं वाढतं वय, आहे तसं स्वीकारा हा मोलाचा सल्ला तिने सर्वांना दिला आहे.