अभिषेकमुळे करिश्माने तडकाफडकी केलं लग्न ? त्या निर्णयाचा आजही पश्चाताप ?

| Updated on: May 01, 2024 | 1:11 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. कपूर घराण्याचा वारसा चालवणाऱ्या करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यात खूप यशस्वी ठरली, जवळपास सर्व मोठ्या अभिनेत्रींसोबत तिने काम केलं. पण करिअरमध्ये जितकं यश तिला मिळालं तितकं यशस्वी तिचं पर्सनल आयुष्य नव्हतं.

अभिषेकमुळे करिश्माने तडकाफडकी केलं लग्न ? त्या निर्णयाचा आजही पश्चाताप ?
Follow us on

अभिनेत्री करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. कपूर घराण्याचा वारसा चालवणाऱ्या करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यात खूप यशस्वी ठरली, जवळपास सर्व मोठ्या अभिनेत्रींसोबत तिने काम केलं. पण करिअरमध्ये जितकं यश तिला मिळालं तितकं यशस्वी तिचं पर्सनल आयुष्य नव्हतं. तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं पण अभिषेक बच्चन सोबत तिच्या अफेअरची बरीच चर्चा झाली.रिपोर्ट्सनुसार, ‘हां मैंने भी प्यार किया है’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे कुटुंबीय या नात्यामुळे खूश होते. अमिताभ बच्चन यांनाही करिश्मा कपूर आवडली, त्यांची होणारी सून म्हणून करिश्माची ओळख होती. त्यानंतर अभिषेक -करीश्माचा साखरपुडाही झाला. पण मध्येच माशी शिंकली आणि लग्नाआधीच 2002 मध्ये करिश्मा आणि अभिषेकची एंगेजमेंट तुटली. बबिता यांच्या एका अटीमुळे त्या दोघांचं हे नातं तुटलं असं म्हटलं जातं. त्यामुळेच दोघांचही लग्न होऊ शकलं नाही.

बबिता कपूर यांना करायचं होत एक ‘ॲग्रीमेंट’

आपली मुल चांगलं आयुष्य जगावीत, त्यांचं भविष्य सुरक्षित असावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. करिश्माची आई आणि अभिनेत्री बबिता यांचीही अशीच इच्छा होती. करिश्माचं भविष्य चांगलं असावं, तिला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी बबिता यांना एक ‘ॲग्रीमेंट’ करायचं होतं, अशी चर्चा होती. पण त्या ‘ॲग्रीमेंट’ वर अमिताभ आणि जया बच्चन यांच्याही सह्या हव्या होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांनी अशा कोणत्याही करारावर सही करणे नाकारले. त्यांनी बबिता यांना त्यांच्या तोंडावरच स्पष्टपणे नकार दिला. यानंतर अचानकच अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचं नातं तुटलं, त्यांचा साखरपुडा मोडला.

डिप्रेशनमध्ये होती करिश्मा ?

अभिषेक बच्चनसोबत लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूर डिप्रेशनमध्ये गेली अशी चर्चा होती. आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच तिने 2003 साली बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर करिश्मा कपूर चित्रपटांपासून दूर राहिली. अभिषेक बच्चनसोबतची एंगेजमेंट तोडल्यानंतर करिश्मा कपूरने घाईघाईत लग्न केल्याची चर्चा आहे. पण हे लग्न तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. ज्याचा तिला आजही पश्चाताप होत असेल.

घरगुती हिंसाचाराची ठरली बळी

संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर करिश्मा कपूर घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती. तिचा पती संजय कपूर तिला बरीच मारहाण करायचा. रिपोर्ट्सनुसार, हनिमूनला गेल्यावर संजयने त्याच्या मित्रांनाही त्याच ठिकाणी बोलावून तिची बोली लावली होती. बराच काळ त्रास सहन केल्यानंतर करिश्मा कपूरने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये करिश्मा संजय कपूरपासून विभक्त झाली. त्या दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहेत. सध्या करिश्मा मुंबईत एकटीच मुलांचे संगोपन करत आहे. तर संजय कपूरनेही मूव्ह ऑन केले असून त्याने पुन्हा लग्न केलं आहे. तर अभिषेकनेही 2007 साली ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले असून त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी देखील आहे.