मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीज नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. इकरा अजीजचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली असून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
अभिनेत्री इकरा अजीज ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. बुधवारी इकराने तिचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पण इकाराने घातलेला हा ड्रेस वन-साइड ऑफ-शोल्डर असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नेटकरी संतापले आहेत.
इकरानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती गुलाबी ड्रेसमध्ये कपड्यांचा ब्रँडचं प्रमोशन करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इकरा खेळताना, उड्या मारताना आणि वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसंच इकरानं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बुधवारी आम्ही गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतो, म्हणजे मुली. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
इकरा अजीजनं घातलेला हा बॅकलेस ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांना राग व्यक्त करत त्यांनी तिला संस्कृतीची आठवण करून दिली आहे. ट्विंकल नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीनं लिहिले, “तुम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राहताय. ” तर एकीनं सांगितलं की, आम्ही पण गुलाबी रंगाचे कपडे घालतो पण सोबत शलवारही घालतो. तू घालायला विसरलीस.
पुढे इर्शाद इक्बालने लिहिलं, “हा ड्रेस घालताना तुला लाज वाटायला पाहिजै इकरा.” तर दुसऱ्यानं लिहिले, “सुंदर पारंपारिक कपडे सोडून हे असं परिधान केल्यास पाकिस्तानची परंपरा नष्ट होईल.”
इकरा अझीझने आतापर्यंत अनेक हिट पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केले आहे. सुनो चंदा, रांझा रांझा करडी, कुर्बान आणि रकीब यांसारख्या शोमध्ये तिनं काम केले आहे. तसंच 2021 मध्ये आलेल्या खुदा और मोहब्बतच्या सीझन 3 मध्ये इकरा मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यात ती पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानसोबत दिसली होती.