शाहरूख खानला चक्क एका मराठी अभिनेत्यासोबत लग्न करायचं होतं; फोनवर केलं होतं प्रपोज

| Updated on: Jan 14, 2025 | 7:43 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान जो करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो. पण तुम्हाला माहितीये का की, शाहरूख खान चक्क एका मराठी अभिनेत्याच्या प्रेमात एवढा बुडाला होता की त्याला चक्क त्याच्याशी लग्न करायचं होतं. एवढच नाही तर त्याने फोनवरून त्या अभिनेत्याला लग्नाची मागणी घातली होती.

शाहरूख खानला चक्क एका मराठी अभिनेत्यासोबत लग्न करायचं होतं; फोनवर केलं होतं प्रपोज
Follow us on

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान जो करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो. लाखो मुली त्याच्यासाठी वेड्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का हा किंग खान एका अभिनेत्याच्या प्रेमात एवढा बुडाला होता की त्याला चक्क त्याच्याशी लग्न करायचं होतं.

चक्क फोन करून प्रपोज केलं

शाहरुख खानचं त्याची बायको गौरीवर किती प्रेम आहे, हे सगळेच जाणतात. पण एक अशी व्यक्ती  होती, जिच्या प्रेमात शाहरुख पूर्ण बुडाला होता. एवढच नाही तर फोन करून त्या व्यक्तिला त्याने लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

शाहरूख खान ज्या व्यक्तिच्या प्रेमात होता ती कोणी अभिनेत्री नाही तर तो एक मराठमोळा अभिनेता आहे. याच मराठमोळ्या अभिनेत्यासोबत शाहरुखला लग्न करायचं होतं. हा अभिनेता म्हणजे महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख. शाहरुखने रितेशशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा खुलासा खुद्द रितेशने एका मुलाखतीत केला होता.

मराठमोळ्या अभिनेत्याशी शाहरूखला करायचं होतं लग्न

शाहरुख खान आणि रितेश देशमुख यांच्यात खूप चांगले नाते आहे. रितेशने एकदा त्यांच्या हा एका मजेदार क्षणाचा उल्लेख केला होता. त्याने सांगितले होते की, शाहरुखने गंमतीत सांगितले होते की त्याला रितेशशी लग्न करायचे आहे. रितेशने शाहरुख खानला मोबाईल भेट दिल्याची घटना सांगितली होती.

त्या काळात, आयफोन भारतात नवीन होता आणि तो बाजारात सहज उपलब्ध होत नव्हता. त्यावेळी रितेशने परदेशातून दोन आयफोन खरेदी केले होते. त्यातील एक त्याने शाहरुख खानला भेट म्हणून दिला होता. शाहरुख खानला नवीन डिव्हाइस वापरायला आवडते. रितेश देशमुखने भेट दिलेला आयफोन मिळाल्यानंतर तो खूपच आनंदी आणि उत्साही झाला.

आयफोन पाहाताच शाहरुखचा आनंद अन् उत्साह पाहण्यासारखा होता

आयफोन पाहाताच शाहरुखने रितेश देशमुखला फोन करून आयफोनबाबत त्याचा उत्साह दाखवला आणि आभार मानले. रितेशने याबद्दल सांगितले होते की, ”11 वाजता शाहरुखने मला कॉल केला आणि म्हणाला, ‘रितेश, ही काय गोष्ट आहे यार, हे खूपच भारी आहे.’

त्यावर रितेशने सांगितले की त्याने त्याच्यासाठी गिफ्ट पाठवले आहे. यावर शाहरुखने मजेदार प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, “मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.” शाहरूखची ही प्रतिक्रिया ऐकून रितेशही थक्क झाला होता.

शाहरूखने गंमतीत प्रतिक्रिया दिली होती. पण त्याच्याकडून अशी प्रतिक्रिया येईल याचा अंदाज मात्र शाहरूखला नव्हता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकर रितेशचा ‘रेड 2’ आणि ‘हाऊसफुल 5’ रिलीज होणार आहे.