मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायक केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांचे आज (मंगळवारी) निधन (Death) झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथे जगाचा निरोप घेतला. एका म्युझिक कॉन्सर्टसाठी केके कोलकाताला गेले होते. तेथे कॉन्सर्ट (Concert) झाल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके (KK) यांनी हिंदी, तामिळ, मराठी, गुजराती अशा अनेक भाषेत त्यांनी गाणी गायली आहेत. केकेने रोमँटिक ते पार्टी गाण्यांपर्यंत सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. त्यांच्या अशा अकस्मात जाण्याने संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. 90 च्या दशकात केके यांनी गायलेले ‘यारो’ हे गाणे फार गाजले आणि त्यानंतर केके यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यानंतर 1999 साली आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रीत केले ‘तडप तडप के इस दिल से आह निकली रही’ या गाण्याने तरुणांच्या मनावर अधिराज्य केले.
महेश भट निर्मित शायनी आहुजा आणि कंगना रनौटची मुख्य भूमिका असेलला ‘वो लम्हे’ चित्रपटातील ‘क्या मुझे प्यार है’ हे गाणेही विशेष गाजले.
‘रहना तेरे दिल में’ चित्रपटातील आर माधवन आणि दिया मिर्झा यांच्यावर चित्रीत झालेले ‘सच कह रहा है दीवाना’ या गाण्याने प्रत्येक प्रेमवीराला आपलंसं केले.
केकेने गायलेले ‘हम रहे या ना रहे कल’ हे गाणे इंडियन आयडॉल या म्युझिक शो मुळे विशेष गाजले होते. आजही हे गाणे रसिकांच्या हृदयावर राज्य करतंय.
इमरान हाश्मी आणि कंगना रनौट अभिनीत ‘गँगस्टर’ चित्रपटातील केके यांनी गायलेल्या ‘तू ही मेरी शब है’ हे गाण्यालाही तितकीच प्रसिद्धी मिळाली.
केकेच्या आवाजातील ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातील ‘खुदा जाने’ या गाण्याने रसिकांच्या हृदयावर राज्य केलेच. त्यासोबतच म्युझिक चार्टवरही या गाण्याने नंबर वन मिळवला.
काइट चित्रपटातील हृतिक रोशन आणि बार्बरा मोरी यांच्या चित्रीत करण्यात आलेले ‘जिंदगी दो पल की’ या गाण्यालाही रसिकांची चांगली पसंती मिळाली. हे पहिले टायटल ट्रॅक आहे जे सर्वात आधी रिलीज करण्यात आले होते.
‘आखों में तेरी अजब जी अजब सी अदाए’ (चित्रपट : ओम शांती ओम)
‘आशाए’ (चित्रपट : इकबाल)